अल्पवयीन मुलीवर ब्लेडने वार

गोरेगाव - भगतसिंगनगर येथे राहणाऱ्या 17 वर्षांच्या मुलीवर ब्लेडने हल्ला करणाऱ्या रोड रोमियोला पोलिसांनी अटक केली आहे. शंकर भरद्वाज असे या तरुणाचे नाव आहे. शंकरचे या मुलीवर एकतर्फी प्रेम होते. तो मुलीला नेहमी त्रास द्याचा. पण मुलीने कधी त्याला प्रत्युत्तर दिले नाही. पण 5 मार्चला शंकरने या मुलीला रस्त्यात अडवले. मला तुझ्याशी बोलायचे आहे, असे शंकरने तिला सांगितले. पण त्यावेळी तिने दुर्लक्ष केले. याचाच राग आल्याने शंकरने तिच्या चेहऱ्यावर ब्लेडने वार केले आणि फरार झाला. मुलीवर सिद्धार्थ रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी बांगुरनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Loading Comments