गुंगीचे औषध देऊन डाँक्टरनेच रुग्ण महिलेवर केले अत्याचार

दरम्यान ऐक दिवशी पीडित महिला औषध घेण्यासाठी एकटीच वंशराजच्या क्लिनिकमध्ये आली असताना. वंशराजने तिला औषधांच्या नावाखाली गुंगीचे औषध देऊन अत्याचार केले.

SHARE
डाँक्टर देवाचं रुप असतं असे मानले जाते. माञ जोगेश्वरीच्या मेघवाडी येथे रुग्ण महिलेला गुंगीचे औषध देऊन डाँक्टरकडूनच रुग्ण महिलेवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ऐवढ्यावरच न थांबता या नराधमाने बेशुद्ध महिलेचा अश्लील व्हिडिओ काढून तिला ब्लँकमेल केल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे.  या प्रकरणी मेघवाडी पोलिसांनी वंशराज द्विवेदी या डाँक्टरला अटक केली असून न्यायालयाने त्याची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे. 


जोगेश्वरी पूर्व परिसरात वंशराज रहात असून घरापासून काही अंतरावरच त्याचे क्लिनिक आहे. डिसेंबर 2018 मध्ये पीडित महिला तिच्या आईसोबत उपचारासाठी सलग दोन ते तीन दिवस वंशराजच्या क्लिनिकमध्ये आली होती. त्यामुळे वंशराजची तिच्यावर वाईट नजर होती. दरम्यान ऐक दिवशी पीडित महिला औषध घेण्यासाठी एकटीच वंशराजच्या क्लिनिकमध्ये आली असताना. वंशराजने तिला औषधांच्या नावाखाली गुंगीचे औषध देऊन अत्याचार केले. ऐवढ्यावरच न थांबता त्याने बेशुद्ध असलेल्या  महिलेचे अश्लील चिञीकरण ही केले. महिलेला जाग आल्यानंतर तिला आपल्यावर डाँक्टरने अत्याचार केल्याचे लक्षात आले. डाँक्टरने याबाबत कुणाला ही काही ही न सांगण्याची धमकी दिली. या बाबत कुणाला कळाल्यास व्हिडिओ वायरल करण्याची धमकी त्याने पीडितेला दिली. 

काही दिवसानंतर पीडितेचे मालाड येथील तरुणासोबत लग्न झाले. सर्व काही सुरळीत सुरू असतानाच एक दिवशी डाँक्टरने पून्हा फोन करून तिच्याजवळ शरीरसुखाची मागणी केली. त्याला तरुणीने नकार दिल्याने डाँक्टरने तो व्हिडिओ पीडितेच्या पतीच्या मोबाईलवर पाठवला. तो व्हिडिओपाहून पीडितेच्या पतीच्या पायाखालची जमिनच सरकली. या प्रकरणी पीडितेने मेघवाडी पोलिस ठाण्यात डाँक्टर विरोधात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
 
संबंधित विषय
ताज्या बातम्या