पत्रकारांचे निषेध आंदोलन

 Vidhan Bhavan
पत्रकारांचे निषेध आंदोलन

नरिमन पॉईंट - कायदेशीर संरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी पत्रकारांनी रविवारी मंत्रालयासमोर काळ्या फिती लावून आंदोलन केले. "राज्यातील पत्रकारांना कायदेशीर संरक्षण मिळावे, पत्रकारांवरील हल्ले हे अजामिनपात्र गुन्हे ठरवावेत आणि पत्रकारांवरील हल्ल्याचे खटले जलदगती न्यायालयात चालवावेत, या मागण्यांसाठी राज्यातील पत्रकार गेले 10 वर्षे लढा देत आहेत. राज्य सरकारने आतपर्यंत फक्त आश्वासन देत कोणतीच कृती केली नाही", अशी खंत यावेळी उपस्थित पत्रकारांनी व्यक्त केली.

Loading Comments