चारकोपच्या मंदीराला आग लागली नाही लावली, एकाला अटक


चारकोपच्या मंदीराला आग लागली नाही लावली, एकाला अटक
SHARES

चारकोपच्या साई मंदिराला रविवारी पहाटे आग लागल्याची दुर्घटना घडली. या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला. मात्र पोलिस तपासात ही आग लागली नसून कुणीतरी जाणीव पूर्वक लावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसानी आता एकाला अटक केली आहे.  जुन्या भांडणाचा राग आणि मारहाण केल्याचा बदला घेण्याच्या उद्देशाने आरोपी भावेश चांदोरकर याने अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने तिघांना पेटवून दिल्याचे पोलिसांच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून भावेशला अटक करण्यात आली आहे तर त्याच्या साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे.

हेही वाचा:- ईडीच्या कार्यालावर शिवसैनिकांनी लावलं भाजपा प्रदेश कार्यालयाचे पोस्टर

चारकोपच्या पाखाडी रोड परिसरात असलेल्या साईबाबा मंदीर येथे रविवारी पहाटे चारच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये मंदिरात झोपलेल्या  सुभाष तरडे, युवराज पवार आणि मन्नू गुप्ता या तिघांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेची चारकोप पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असता मंदिरामधील वॉटर कुलर आणि एअर कुलरचा एखाद्या ज्वालाग्राही पदार्थामुळे स्फोट झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते. न्यायवैद्यकीय पथक आणि अग्निशमन दलाकडून त्याअनुषंगाने प्राथमिक अहवाल हाती मिळाल्यानंतर यामध्ये काहीतरी घातपात असल्याचा संशय पोलिसांना आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक घनःश्याम नायर, सहायक निरीक्षक विक्रम बाबर, जिनपाल वाघमारे, उपनिरीक्षक विजय शिंदे, विजय सावंत यांच्यासह पोलिसांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. आगीमध्ये मृत्यू झालेल्या सुभाष, युवराज आणि मन्नू या तिघांची माहिती काढत असताना याच परिसरात राहणाऱ्या भावेश चांदोरकर याच्यासोबत त्याचे वारंवार भांडण होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

हेही वाचा:- मी जर तोंड उघडलं तर भाजपच्या दिग्गज नेत्यांना देशाबाहेर जावं लागेल - संजय राऊत

 त्यातच दोन दिवसांपूर्वी युवराजने भावेशला सिगारेट आणण्यास सांगितली. मात्र भावेशने नकार देताच युवराजने त्याला मारहाण केली, असेही काहींनी सांगितले. भावेश आगीच्या घटनेपासून गायब होता. परिसरातील खबऱ्यांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक पुराव्यांवरून औरंगाबाद येथे नातेवाईकांकडे असलेल्या भावेशला पोलिसांनी शोधून काढले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या भावेशने पोलिसी खाक्या मिळताच गुन्ह्याची कबुली दिली आहे. अल्पवयीन मित्राच्या मदतीने तिघांना जिवंत जाळल्याचे त्याने सांगितले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा