गुगल पे द्वारे महिलेला दीड लाखांना गंडवलं

गुगल-पे या डिजिटल पेमेंटचा वापर करून कांदिवलीच्या चारकोपमध्ये रहात असलेल्या महिलेला १ लाख ४८ हजारांना गंडविल्याचं समोर आलं आहे.

गुगल पे द्वारे महिलेला दीड लाखांना गंडवलं
SHARES
डिजिटल पेमेंट सुविधेने आर्थिक व्यवहार सोपे झाले असले, तरी यामुळे फसवणुकीच्या प्रमाणातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबईत गुगल-पे या डिजिटल पेमेंटचा वापर करून कांदिवलीच्या चारकोपमध्ये रहात असलेल्या महिलेला १ लाख ४८ हजारांना गंडविल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी चारकोप परिसरात गुन्हा नोंदवला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.


'असे' गेले पैसे

कांदिवलीत रहात असलेली तक्रारदार  ४३ वर्षीय महिला आॅनलाईनद्वारे कपडे खरेदी विक्रीचा व्यवसाय करते. २८ आॅगस्टला तिला तिच्या एका मैत्रीणीने फोन केला. या मैत्रीणीने एका अनोळखी ग्राहकाला कपडे खरेदी करायचे असून तो आगाऊ रक्कम  देण्यास तयार असल्याचं सांगितलं. मात्र आपलं गुगल पे चालत नसल्याने तक्रारदार महिलेच्या मैत्रीणीने तिला त्याची आॅर्डर स्वीकारण्यास सांगितली. त्यानुसार पीडितेला अनोळखी व्यक्तिचा फोन आला. फोनवरील व्यक्ती पीडित महिलेशी कपड्यांविषयी बोलत असतानाच, पीडित महिलेच्या मोबाइलवर अचानक खात्यातून पैसे काढल्याचा मेसेज येऊ लागला.

फसवणूक झाली

पीडित महिलेने सुरूवातीला लक्ष दिलं नाही. मात्र वारंवार मेसेज वाजू लागल्यान तिचं मेसेजकडं लक्ष गेलं. खात्यातून पैसे निघून जात असल्याचं लक्षात आल्यानंतर तिने फोन कट करून बँकेत फोन लावून व्यवहार थांबवले. मात्र तोपर्यंत तक्रारदार महिलेच्या खात्यातून आरोपीने १ लाख ४८ हजार रुपये काढले होते. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर तक्रारदार महिलेने चारकोप पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून अधिक तपास सुरू असल्याचं सांगितलं.



हेही वाचा-

काॅ. गोविंद पानसरे हत्येप्रकरणी आणखी तिघांना अटक

बोगस टेलिफोन एक्स्चेंज प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा