बोगस टेलिफोन एक्स्चेंज प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक

प्रकरणातील मुख्य आरोपी हा फरार झाला होता. त्याला पकडण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हैद्राबाद येथून अटक केली. या प्रकरणात आरोपींनी सरकारचे तब्बल 150 कोटींचे नुकसान केले होते.

बोगस टेलिफोन एक्स्चेंज प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक
SHARES

मुंबईत  बेकायदा टेलीफोन एक्स्चेंज चालविणाऱ्या ७ जणांच्या टोळीचा महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलिसांनी काही दिवसांपूर्वी पर्दाफाश केला आहे. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी फरार झाला होता. रफीक अल्लातूर असं या आरोपीचं नाव आहे. त्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हैद्राबाद इथून अटक केली. या प्रकरणात आरोपींनी सरकारचं तब्बल १५० कोटींचं नुकसान केलं होतं.

६ ठिकाणी छापे

पोलिसांनी ६ ठिकाणी छापे टाकून सीमकार्ड, वायफाय राऊटर, लॅपटॉप आणि अ‍ॅन्टीना केबल असा एकूण ६ लाखांचा ऐवज जप्त केला आहे. बेकायदा यंत्रणेद्वारे ही टोळी बहारिन, कुवेत, कतार, दुबई या आखाती देशांत संपर्क साधत होती. या टोळक्‍याचा दहशतवादी कारवायांशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, एटीएस तपास करत आहे. भारतीय टेलिग्राफ कायदा व माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्यांतर्गत आरोपींविरोधात काळाचौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

६ रुपयांत परदेशी काॅल

परदेशात दूरध्वनी करण्यासाठी तासाला १८ रुपये आकारले जातात; मात्र आरोपी फक्त ६ रुपये आकारत होते. या बेकायदा टेलिफोन एक्‍स्चेंजमधून परदेशांत होणाऱ्या संपर्काबाबत कोणतीही माहिती मिळवणं सुरक्षा यंत्रणांना शक्‍य होत नाही. हे टोळकं व्हीओआयपी (व्हॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल) पद्धतीने स्थानिक मोबाईल क्रमांकावरून परदेशात संपर्क साधायचे. त्यांनी अशा पद्धतीने केंद्र सरकारचा ३७ कोटी ५० लाख रुपयांचा महसूल बुडवल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. 

'इथं' टाकले छापे

एटीएसने मशीद बंदर, डोंगरी, वरळी, गोवंडी, पनवेल, कल्याण या ठिकाणी छापे टाकून या टोळीचा पर्दाफाश केला आहे. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी हा राज्याबाहेर पळून गेला होता. मागावर असलेल्या पोलिसांना तो वेळोवेळो गुंगारा देत होता. मात्र पोलिसांना तो हैद्राबाद इथ लपून बसल्याची कूणकुण लागली. त्यानुसार त्याला ९ आॅगस्ट रोजी अटक केली. या आरोपींकडून डेल कंपनीचा सर्व्हर, ९ सिमकार्ड बॉक्‍स, ५१३ सिमकार्ड, ३ लॅपटॉप, ४ डेस्कटॉप, ७ वायफाय राऊटर, २ इंटरनेट टर्मिनेटिंग स्विच व ११ मोबाइल अशी ६ लाख ५५ हजारांची सामग्री जप्त करण्यात आल्याची माहिती एटीएस अधिकाऱ्यांनी दिली.हेही वाचा- 

काॅ. गोविंद पानसरे हत्येप्रकरणी आणखी तिघांना अटक

कोहिनूर घोटाळा: मनसे नेते नितीन सरदेसाईंची 'ईडी'कडून चौकशीसंबंधित विषय