कोहिनूर घोटाळा: मनसे नेते नितीन सरदेसाईंची 'ईडी'कडून चौकशी

कोहिनूर मिल गैरव्यवहार प्रकरणी गुरूवारी अंमलबजावणी संचलनालया (ईडी)ने मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांना चौकशीसाठी बोलावलं आहे.

कोहिनूर घोटाळा: मनसे नेते नितीन सरदेसाईंची 'ईडी'कडून चौकशी
SHARES

कोहिनूर मिल गैरव्यवहार प्रकरणी गुरूवारी अंमलबजावणी संचलनालया (ईडी)ने मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. या प्रकरणात ईडीने याआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पूत्र उन्मेष जोशी यांची चौकशी केली आहे. ठाकरे आणि जोशी यांच्याप्रमाणेच सरदेसाई यांचीही दिवसभर चौकशी होण्याची शक्यता आहे.  

हेही वाचा- 'अंमलबजावणी संचलनालय' हा फलक मराठीत हवा!, मनसेची महापालिकेकडं तक्रार 

कंपनीत सहभागीदार

सरकारी क्षेत्रातील कंपनी 'इन्फ्रास्ट्रक्चर लिजिंग अँड फायनान्शिअर सर्व्हिसेस'द्वारे (ILFS) मुंबईतील ‘कोहिनूर सीटीएनएल’ कंपनीला ८६० कोटी रूपयांचे कर्ज देण्यात आलं होतं. या कंपनीत उन्मेष जोशी, उद्योजक राजेंद्र शिरोडकर, मनसे नेते राज ठाकरे हे सहभागीदार होते. या व्यवहारात 'आयएलएफएस'चं मोठं नुकसान झाल्यामुळे कंपनीने आपले शेअर्स विकले. या गुंतवणुकीतून कालांतराने राज ठाकरे यांनी २००८ मध्ये त्यांचे शेअर्स काढून घेतले हाेते

हेही वाचा- सूडाचं राजकारण!

'ईडी'कडे तक्रार

या व्यवहारात सरकारी कंपनीला मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कंपनीच्या विश्वस्थांनी अंमलबजावणी संचालनालय (ईडी)कडे तक्रार नोंदवली. या व्यवहारात नितीन सरदेसाई यांचाही सहभाग असल्याचं पुढे आल्यानंतर ईडीने नितीन सरदेसाई यांना गुरूवारी चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं होतं. त्यानुसार गुरूवारी सकाळी ११.३० च्या सुमारास नितीन सरदेसाई ईडी कार्यालयात हजर झाले.



हेही वाचा-

साडे आठ तासानंतर राज ठाकरे ईडीच्या कार्यालयाबाहेर

राज ठाकरेंना अटक होईलच असं नाही- दीपक केसरकर



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा