Advertisement

'अंमलबजावणी संचलनालय' हा फलक मराठीत हवा!, मनसेची महापालिकेकडं तक्रार

राज ठाकरे ‘ईडी’च्या कार्यालयाबाहेर येताच ‘ईडी’ने आपल्या कार्यालयाबाहेरील फलक मराठीतून का लावला नाही, असा प्रश्न उपस्थित करत मनसेने ट्विटरवरून आपल्या शैलीत ईडीला ‘नोटीस’ दिली. यापुढं जात आता मनसेने यासंबंधीची रितसर तक्रार महापालिकेकडे नोंदवली आहे.

'अंमलबजावणी संचलनालय' हा फलक मराठीत हवा!, मनसेची महापालिकेकडं तक्रार
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस पाठवून अंमलबजावणी संचलनालया (ED)ने कोहिनूर मिल घोटाळ्याप्रकरणी त्यांची तब्बल साडेआठ तास चौकशी केली. या चौकशीनंतर राज ठाकरे ‘ईडी’च्या कार्यालयाबाहेर येताच ‘ईडी’ने आपल्या कार्यालयाबाहेरील फलक मराठीतून का लावला नाही, असा प्रश्न उपस्थित करत मनसेने ट्विटरवरून आपल्या शैलीत ईडीला ‘नोटीस’ दिली. यापुढं जात आता मनसेने यासंबंधीची रितसर तक्रार महापालिकेकडे नोंदवली आहे.

हेही वाचा-सूडाचं राजकारण!

फलक मराठीतून हवा

‘ईडी’च्या मुंबईतील फोर्ट येथील कार्यालयाबाहेर जो फलक लावण्यात आला आहे, त्यावर ‘प्रवर्तन निर्देशालय’ असा हिंदीतून आणि त्याखालोखाल ‘enforcement directorate’ असा इंग्रजीतून मजकूर लिहिण्यात आला आहे. या फलकावर मराठीचा कुठेही वापर करण्यात आलेला नाही. हा प्रकार म्हणजे महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम १९४८ अंतर्गत महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नियम १९६१ च्या नियम २० ‘ए’ चा भंग करणारा आहे. त्यामुळे या फलकावर मराठीतून ‘अंमलबजावणी संचलनालय’ असा उल्लेख असावा अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा- महाराष्ट्राचे आरोपी, मनसेची भाजपच्या नेत्यांविरोधात पोस्टरबाजी

वाॅर्ड आॅफिसला पत्र

त्यासाठी मनसेचे उपाध्यक्ष मिलिंद गावडे यांनी महापालिकेच्या फोर्ट येथील ‘ए’ विभाग कार्यालयाला पत्र देखील पाठवलं आहे. या पत्राची प्रत मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय, ईडी कार्यालय तसंच महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना देखील पाठवण्यात आली आहे. 



हेही वाचा-

पलटवार! आता मनसेनं पाठवली ‘ईडी’ला नोटीस

राज ठाकरेंना अटक होईलच असं नाही- दीपक केसरकर



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा