Advertisement

राज ठाकरेंना अटक होईलच असं नाही- दीपक केसरकर

अंमलबजावणी संचलनालया (ED)ने राज ठाकरे यांना कोहिनूर मिल घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी बोलावलं आहे. मात्र याचा अर्थ त्यांना अटक होईलच असं नाही, असं वक्तव्य राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केलं.

राज ठाकरेंना अटक होईलच असं नाही- दीपक केसरकर
SHARES

अंमलबजावणी संचलनालया (ED)ने  राज ठाकरे यांना कोहिनूर मिल घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी बोलावलं आहे. मात्र याचा अर्थ त्यांना अटक होईलच असं नाही, असं वक्तव्य राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केलं. 

राज याचं सहकार्य

राज ठाकरे ईडीला चौकशीसाठी पूर्णपणे सहकार्य करत आहेत. त्यांनी ही चौकशी संयमाने घेतली असून आपल्या कार्यकर्त्यांना शांतात पाळण्याचंही आवाहन देखील त्यांनी केली आहे. त्यामुळे दिल्लीत जे घडलं ते महाराष्ट्रात घडणार नाही. शिवाय याआधी ईडीने ज्यांची चौकशी केली आहे. त्या सर्वांनाच अटक झाली, असंही नाही, असं केसरकर म्हणाले.   

आवश्यक तेवढीच कारवाई

पोलिसांना देखील संयम पाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक तेवढीच कारवाई केली आहे. मनसे कार्यकर्त्यांची धरपकडच करायची असती तर ती कालच करता आली असती. पण तसं केलं नसल्याचं केसरकर यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा-

संकटकाळात उद्धव ठाकरे राज यांच्या पाठिशी- राऊत

राज ठाकरे चौकशीला गेलेत की सत्यनारायणाच्या पुजेला? अंजली दमानिया यांची टीका

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा