Advertisement

राज ठाकरे चौकशीला गेलेत की सत्यनारायणाच्या पुजेला? अंजली दमानिया यांची टीका

राज ठाकरे चौकशीसाठी सहकुटुंबियांसोबत गेल्यानं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी निशाणा साधला आहे.

राज ठाकरे चौकशीला गेलेत की सत्यनारायणाच्या पुजेला? अंजली दमानिया यांची टीका
SHARES

कोहिनूर गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसूली संचलनालय (ईडी) कार्यालयात चौकशीसाठी जाण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटुंब रवाना झाले. राज ठाकरे 'ईडी' कार्यालयात दाखल झाले असून कुटुंब कार्यालयाजवळील ग्रॅण्ड हॉटेलमध्ये थांबले आहे. मात्र, राज ठाकरे चौकशीसाठी सहकुटुंबियांसोबत गेल्यानं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी निशाणा साधला आहे. 'राज ठाकरे सहकुटुंब ईडीच्या चौकशीला निघालेत की सत्यनारायणाच्या पूजेला?, असं ट्वीट अंजली दमानिया यांनी केलं आहे.


सहानभुतीचा प्रयत्न

'राज ठाकरे सहकुटुंब 'ईडी'च्या चौकशीला निघालेत का सत्यनारायणाच्या पूजेला? बायको, मुलगा, सून, मुलगी आणि बहीण? सगळे मिळून माहिती देणार का? काय हा drama? का सहानभूती गोळा करण्याचा हा प्रयत्न', अशा शब्दांत अंजली दमानिया यांनी ट्विटरवरून राज ठाकरेंवर टीका केली. राज ठाकरे सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास आपल्या कृष्णकुंज या निवासस्थानातून ईडी कार्यालयाच्या दिशेनं रवाना झाले. राज यांच्यासोबत पत्नी शर्मिला, मुलगा अमित, सून मिताली, मुलगी उर्वशी आणि बहिणही आहे.

किती योग्य ?

'एवढा ड्रामा कशाला? निघताना कुटुंबाला घेऊन जाणं किती योग्य आहे? ईडी कार्यालयात जाताना एकट्याने जावं, चौकशीला सामोरं जाऊन परत यावं. राज ठाकरे सरकारविरुद्ध बोलत आहेत म्हणून त्यांच्यावर सूडबुद्धीनं कारवाई केली जातेय, असं म्हटलं जात असलं तरी, राज ठाकरेंकडं एवढी अमाप संपत्ती कुठून आली, प्रश्न विचारले तर चुकलं कुठे? खरंतर हे खूप वर्षांपूर्वी व्हायला हवं ते आज झालं, याचं मी अभिनंदन करते' असंही अंजली दमानिया यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.



हेही वाचा -

मनसे नेते संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात

चौकशी राज ठाकरेंची, झोप उडाली पोलिसांची



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा