“राजकारणात आम्ही सतत एकमेकांच्या विरुद्ध उभे आहोत, पण संकट काळात कुटुंब म्हणून एक असतो”, असं म्हणत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत यांनीही राज यांची पाठराखण केली. कोहिनूर मिल जमीन घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचलनालयाने पाठवलेल्या नोटिशीनुसार राज गुरूवारी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले. त्यावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी हे मत व्यक्त केलं.
हेही वाचा- राज ठाकरे चौकशीला गेलेत की सत्यनारायणाच्या पुजेला? अंजली दमानिया यांची टीका
या चौकशीतून काही निष्पन्न होणार नाही असं उद्धव ठाकरे बुधवारी म्हणाले होते. मलाही तेच वाटतं. उद्धव साहेबांनी भाऊ म्हणून भावना व्यक्त केल्या त्या महत्त्वाच्या आहेत. पण चौकशी ही एक प्रक्रिया असते त्यातून लोक तावून सुलाखून बाहेर पडतात. आपण आता त्याकडे तटस्थपणे पाहायला हवं. त्यांचं कुटुंबही सोबत गेलंय, स्वतः उद्धव ठाकरे या प्रकरणावर लक्ष् ठेवून असल्याचंही राऊत पुढं म्हणाले.
सत्यनारायणाची पूजा की श्रावणातील पूजा या नस्त्या उठाठेवी कुणी करू नयेत. ज्यांना कुटुंब आहे तेच कुटुंबाविषयी बोलतात. कुटुंबाने सोबत जाणं यावर टीका करणं हे चांगल्या संस्काराचं लक्षण नाही, असं म्हणत राऊत यांनी दमानिया यांच्या वक्तव्यावर टीका केली.
हेही वाचा-
राज यांना भावाचा पाठिंबा, काय म्हणाले उद्धव ठाकरे?