Advertisement

महाराष्ट्राचे आरोपी, मनसेची भाजपच्या नेत्यांविरोधात पोस्टरबाजी

राज ठाकरेंना ईडीच्या चौकशीचा सामना करावा लागल्यामुळं मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या नेत्यांविरोधात पोस्टरबाजी केली आहे.

महाराष्ट्राचे आरोपी, मनसेची भाजपच्या नेत्यांविरोधात पोस्टरबाजी
SHARES
Advertisement

'कोहिनूर स्क्वेअर' गैरव्यवहाराप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना ईडीनं(ED) नोटीस बजावत चौकशीसाठी बोलवलं होतं. ईडीनं तब्बल ९ तास राज ठाकरे यांची चौकशी केली. चौकशीवेळी राज ठाकरेंनी अधिकाऱ्यांना योग्य सहकार्य केलं. मात्र, राज ठाकरेंना ईडीच्या चौकशीचा सामना करावा लागल्यामुळं मनसेच्या कार्यकर्त्यांनी (MNS) आक्रमक पावित्रा घेत सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून मुख्यमंत्री (Chief Minister) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजपच्या इतर नेत्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.

'महाराष्ट्राचे आरोपी'

'महाराष्ट्राचे आरोपी' या टॅगलाईननं सोशल मीडियावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी काही फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या या फोटोमध्ये प्रत्येक खात्याचा मंत्री, त्याचा फोटो आणि त्यांच्यावर करण्यात आलेले भ्रष्टाचाराचे आरोप असे लिहीले आहे. त्या फोटोवर महाराष्ट्राचे आरोपी आणि मुख्यमंत्र्यांची क्लीन चिट असंही लिहीलं आहे. तसंच, या फोटोखाली राज्याचा केलाय नरक, नको हे सरकार परत अशीही टॅगलाईन दिली आहे.

भ्रष्टाचाराचा आरोप

शेअर केलेल्या फोटोमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांसह अनेक मंत्र्यांचा समावेश असून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे.हेही वाचा -

आर सीटी मॉलमध्ये ओपन होणार IKEAचं शॉप

विधानसभा निवडणुकीच्या तारखा ऑक्टोबरमध्ये होणार जाहीर?संबंधित विषय
Advertisement