संचारबंदीतही वाधवान कुटुंबातील २३ जण मुंबईहून गेले महाबळेश्वरला, प्रकरणाची होणार चौकशी


संचारबंदीतही वाधवान कुटुंबातील २३ जण मुंबईहून गेले महाबळेश्वरला, प्रकरणाची होणार चौकशी
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी असताना वाधवान कुटुंबातील 23 लोक महाबळेश्वरला प्रवास करुन आले. वाधवांना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मुंबई सोडण्यात मदत केल्याचे बोलले जाते. त्यांच्याकडे मंत्रालयातील पत्र असल्याने त्यांना कुणीच अकडले नसल्याची माहिती मिळत आहे.माञ आता वाधवान कुटुंबियांनी मुंबई सोडलीच कशी, वाधवान यांना राज्याचे गृहसचिव अमिताभ गुप्ता यांनी पञ दिल्याचे ट्विट भाजपचे मुलुंडचे आमदार मिहिर कोटेजा यांनी केले आहे. या प्रकरणी गुप्ता यांची आता चौकशी होणार असल्याची माहिती गृहमंञी अनिल देशमुख यांनी दिली आहे.


राज्यात संचारबंदी असताना वाधवान कुटुंबातील 23 लोक महाबळेश्वरला आले होते. त्यावेळी महाबाळेश्वरच्या नागरिकांनी त्यांच्या बंगल्यावर विचारपूस करण्यासाठी गेले असता. ते वाधवान कुटुंबिय असल्याचे पुढे आले. माञ संचारबंदी असताना ते महाबाळेश्वरपर्यंत कसे आले यावर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागल्यानंतर वाधवान यांच्याजवळ चक्क गृहविभागाचे प्रधान सचिवांचे शिफारस पञ सापडले आहे. सचिवांचे पत्र असल्याने त्यांना प्रवासात कुणीच अडवले नसल्याची माहिती आहे. सध्या वाधवान कुटुंबातील 23 जणांना तिथून हलवले असून पाचगणीतील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. सर्वांवर 188 प्रमाणे गुन्हे दाखल केले जाण्याचीही माहिती आहे. दरम्यान, वाधवान कुटुंबातील 23 लोकांना खंडाळा ते महाबळेश्वर यांना जाण्याची परवानगी कशी मिळाली याची चौकशी करणार, असल्याचं ट्विट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. 

तर, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याची चौकशी करण्याच्या मागणीचे पत्र राज्यपालांना दिलं आहे. देश लॉकडाऊन असताना मुंबईतून महाबळेश्वरात दाखल झालेल्या वाधवान कुटुंबामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. राज्यात संचारबंदी असताना या कुटुंबाला कोणी परवानगी दिली असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे त्यांच्याकडे गृह मंत्रालयाच्या विशेष सचिवाचं पत्र असल्याने त्यांना रस्त्यात कोणीच अडवले नाही. या पत्रावर सर्व वाहनांचे क्रमांक आणि सदस्याची माहिती आहे. या पत्रामुळे खळबळ उडाली आहे. सात गाड्यांमधून हे 23 जण मुंबईतून महाबळेश्वरमध्ये एका बंगल्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

हे 23 जणं डीएचएसएल दिवान हौसिंग फाईनान्स यांच्या बंगल्यावर हे सर्वजण वास्तव्यास होते. 23 मध्ये बंगल्याचे मालक आणि कामगारांचा समावेश आहे. महाबळेश्वरातील गणेश नगर सोसायटी शेजारी हा बंगला आहे. या सर्वांचे म्हणणे होते आम्हाला बंगल्यातच होम क्वॉरंटाईन करा. त्यांच्यावर गुन्हा दाखल करताना प्रशासकिय यंत्रना घाबरली असल्याचीही माहिती सुत्रांनी दिलीय. बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता महाबळेश्वरात दाखल झाले आहेत.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा