• भावोजींचं कर्ज मेव्हण्याला भोवलं
  • भावोजींचं कर्ज मेव्हण्याला भोवलं
SHARE

मालवणी - मडमध्ये राहणाऱ्या 26 वर्षीय दिनेश कुमारचं काही अज्ञातांनी 8 जानेवारीला अपहरण केलं होतं. या प्रकरणाचा तपास करून दिनेशची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनेशच्या भावोजींनी अपहरणकर्त्यांकडून 3 लाख रुपये उधार घेतले होते. ते परत न केल्यामुळे त्यांनी दिनेशचं अपहरण केलं. दिनेशच्या भावोजींनी आपल्या व्यावसायासाठी शौकत शेख नावाच्या व्यक्तीकडून 3 लाख रुपये उधार घेतले होते. उधारी चुकती करता आली नाही म्हणून दिनेशच्या भावोजींनी शौकत शेखपासून संपर्क तोडला होता, ते कुठे रहात होते याची कोणालाच माहिती नव्हती. त्यामुळे अखेर शौकत शेखने आपल्या दोन्ही साथिदारांसह दिनेशचं अपहरण केलं आणि पैशांची मागणी केली. दिनेशची पत्नी गावावरुन 1 लाख 50 हजार रुपये घेऊन आली. पण, शेजाऱ्यांच्या मदतीने तिने ते पैसे न देता मालवणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर मालवणी पोलिसांनी जोगेश्वरी इथल्या बेहराम बागमधून दिनेशला 23 जानेवारीला अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सोडवलं. याप्रकरणी 3 आरोपींना अटक केली आहे. मंगळवारी या तिघांना कोर्टात सादर करण्यात आलं. त्या तिघांनाही कोर्टानं 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या