अभिनेत्री दिपिका पदुकोनची मॅनेजर करिश्मा प्रकाशची दुसऱ्या दिवशीही चौकशी

एनसीबीने गेल्या आठवड्यात करिश्माच्या वर्सोवा येथील घरात शोध मोहिम राबवली होती. तेव्हा त्यांना अंमली पदार्थ सापडले.

अभिनेत्री दिपिका पदुकोनची मॅनेजर करिश्मा प्रकाशची दुसऱ्या दिवशीही चौकशी
SHARES

घरात ड्रग्ज सापडल्यानंतर काही दिवसांसाठी फरार झालेली अभिनेत्री दिपिका पुदकोनची मॅनेजर करिश्मा प्रकाश बुधवारी एनसीबीच्या चौकशीला हजर झाली. मात्र एका दिवसाच्या चौकशीत एनसीबीला अपेक्षित उत्तर न मिळाल्यामुळे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तिला दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरूवारी देखील चौकशीला बोलावले होते. करिश्मा दुपारी १२ च्या सुमारास एनसीबीच्या कार्यालयात दाखल झाली होती.

हेही वाचाः- मुंबई आणि नवी मुंबईतील खारफुटीवर पतंग किटकांचा हल्ला

एनसीबीने बुधवारी सहा तास तिची चौकशी केली होती. तिचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया बुधवारी अपूर्ण राहिल्यामुळे गुरूवारीही तिला चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. शुक्रवारीही तिची चौकशी करण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले. अटकपूर्वी जामिनासाठी अर्ज केलेल्या करिश्माने न्यायालयाला आपण केंद्रीय यंत्रणेला सहकार्य करण्यास तयार असल्याचे मंगळवारी सांगितले होते. एनसीबीने गेल्या आठवड्यात करिश्माच्या वर्सोवा येथील घरात शोध मोहिम राबवली होती. तेव्हा त्यांना अंमली पदार्थ सापडले. कमी प्रमाणात हे ड्रग्स असल्यामुळे तिला समन्स पाठवून चौकशीसाठी कार्यालयात येण्यास सांगण्यात आले आहे. रिया चक्रवर्तीला अटक केल्या गुन्ह्यांत एनसीबीने एका ड्रग्स पेडलरला अटक केली होती. त्याच्या चौकशीनंतर करिश्माच्या घरी शोध मोहिम राबवण्यात आली. त्यावेळी ती घरी उपस्थित नव्हती. त्यावेळी तिला समन्स पाठवून चौकशीला बोलवण्यात आले होते. त्यावेळी ती गैरहजर राहिली होती.

हेही वाचाः- आता अ‍ॅमेझॉनवरुन बुक करता येणार गॅस सिलेंडर

त्यानंतर रविवारी एनसीबीने करिश्मा प्रकाशला पुन्हा समन्स पाठवून चौकशीला हजर राहण्यास सांगितले आहे. यापूर्वी करिश्माने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती.याप्रकरणापूर्वी करिश्मा व दिपिका पदुकोन यांच्यातील एक संशयीत चॅटही एनसीबीच्या हाती लागला होता. करिष्मा प्रकाशसोबत २०१७ मध्ये झालेल्या चॅटवरून एनसीबीने दिपीकाची पाच तास चौकशी केली होती

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा