चरस तस्करीप्रकरणी काश्मिरी तरूणाला अटक

जम्मू-काश्मीर येथील अनंतनाग जिल्ह्यातील पेहेलगाम तहशीलमधील रहिवासी असलेला आरोपी सोमवारी शिळफाटा रोड इथं येणार असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता.

चरस तस्करीप्रकरणी काश्मिरी तरूणाला अटक
SHARES

ठाण्याच्या शिळफाटा रोड इथं चरसची तस्करी करण्यासाठी आलेल्या काश्मिरी तरूणाला ठाणे एटीएसच्या पथकाने अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याजवळून २ किलो चरस हस्तगत केली आहे.


सापळा रचून अटक

जम्मू-काश्मीर येथील अनंतनाग जिल्ह्यातील पेहेलगाम तहशीलमधील रहिवासी असलेला आरोपी सोमवारी शिळफाटा रोड इथं येणार असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता. याचवेळेस मोटरसायकलवरून एक संशयीत तरुण तिथं आला. त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्यांच्याकडे १ किलो ८०० ग्रॅम चरस सापडले.


पोलिस कोठडी

आरोपीच्या चौकशीत तो काश्मीरचा असल्याचं पुढे आलं आहे. त्याच्यावर अंमली पदार्थ तस्करी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला ठाण्यातील न्यायालयापुढे हजर केलं असता त्याला १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या अंमली पदार्थांच्या विक्रीचे पैसे दहशतवादी कारवायांसाठी वापरण्यात येत होते का, याबाबत एटीएस तपास करत आहेत.



हेही वाचा-

बोगस प्रमाणपत्र प्रकरणात ३० डाॅक्टर रडारवर

मुंबईवर 'ट्रामाडोल'चं सावट



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा