तिच्या बोलण्यावर भाळू नका... नाहीतर गंडवले जाल!


तिच्या बोलण्यावर भाळू नका... नाहीतर गंडवले जाल!
SHARES

सुंदर महिला दिसली की तिच्या वागण्या बोलण्यावर भाळून अनेकजण तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. पण या नादात महिलेने खिशातील पाकिटासह सोन्याचे दागिने लंपास केल्याचे कळताच पश्चाताप करत बसण्याची पाळी येते. कस्तुरबा मार्ग पोलिसांनी
अशाच एका अट्टल महिला चोराला अटक केली असून तिच्या नावावर कस्तुरबा मार्ग आणि समता नगर पोलीस ठाण्यात चोऱ्यांसोबत हत्येचाही गुन्हा दाखल आहे. उमा एल. एस. उर्फ गुडीया असे तिचे नाव आहे.

लडीवाळ बोलण्याच्या नादात गुंतवून लुटण्यात दहिसरच्या रावळ पाडा परिसरात राहणाऱ्या गुडीयाचा हातखंडा आहे. या कामात तिला अनिल चौहान (२८) आणि मंगेश चौहान (३०) हे दोघेजण मदत करतात. हे दोघेही रावळ पाडा येथे राहणारे असून मंगेश ऑटो रिक्षा चालक आहे. या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


ज्येष्ठ महिलेला लुटले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ ऑगस्ट रोजी एका वयोवृद्ध महिलेने बोरीवलीतून वांद्रे येथे जाण्यासाठी मंगेश चौहानची रिक्षा पकडली. मंगेश या महिलेला घेऊन काही अंतरावर गेल्यानंतर त्या रिक्षा अनिल आणि गुडीया हे दोघेही येऊन बसले.

त्यानंतर या तिघांनी ज्येष्ठ महिलेला धाक दाखवून तिच्याकडून सोन्याची चेन आणि अंगठी काढून घेतली. या प्रकारानंतर तिघांपैकी दोघांनी तेथून तात्काळ पळ काढला आणि मंगेशने ज्येष्ठ महिलेला वांद्रे येथे नेऊन सोडले.


मंगेशने दिली माहिती

या प्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात तक्रारीची नोंद होताच पोलिसांनी तपासादरम्यान मंगेशला अटक केली. त्याच्यावर अशाप्रकारचे अनेक गुन्हे दाखल असल्याने पोलिसांनी त्याला सहज जाळ्यात ओढले. त्याच्या चौकशीतून त्याने अनिल आणि गुडीयाचे नाव सांगितले.

या तिन्ही आरोपींना अटक करून पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.



हे देखील वाचा -

पोलिसच झाले दरोडेखोर, चोरले २४ लाखांचे हिरे



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा