पोलिसच झाले दरोडेखोर, चोरले २४ लाखांचे हिरे

Borivali
पोलिसच झाले दरोडेखोर, चोरले २४ लाखांचे हिरे
पोलिसच झाले दरोडेखोर, चोरले २४ लाखांचे हिरे
पोलिसच झाले दरोडेखोर, चोरले २४ लाखांचे हिरे
See all
मुंबई  -  

कायद्याचा रक्षणकर्ताच जेव्हा चोरीत सामील होऊन सर्वसामान्यांना लुटतो तेव्हा, भरवसा नेमका कुणावर ठेवायचा? असा प्रश्न उपस्थित करणारी घटना बोरीवलीत नुकतीच उघडकीस आली आहे. एका दरोड्याच्या प्रकरणात बोरीवली पोलिसांनी चक्क दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक केल्याने खळबळ उडाली आहे. चंद्रकांत गवारे (४७) आणि संतोष गवस (४४) अशी या दोघांची नावे आहेत.

दे दोन्ही पोलीस कर्मचारी मुंबई पोलिसांच्या सशस्त्र पोलीस बल (Local Armed) विभागातील कर्मचारी आहेत. त्यांच्यासहित पोलिसांनी प्रणय शहा (३६) तसेच आणखी एका आरोपीलाही ताब्यात घेतले आहे.

या दोघांनी आपल्या साथीदारांसोबत मिळून एका हिरे व्यापाऱ्याच्या दुकानात दरोडा घातला आणि २४ लाखांचे हिरे घेऊन तेथून पसार झाले. या दोघांकडून १२ लाखांचे हिरे देखील पोलिसांनी जप्त केले आहेत.


असे शिरले आत

बोरीवलीतील बाभई परिसरात हिरे व्यापारी जयेश झवेरी यांचे ऑफिस आहे. जयेश अनेकदा आपल्या ऑफिसमधून हिऱ्यांची देवाण-घेवाण करतात. याचप्रकारे बुधवारी ते आपल्या ऑफिसमध्ये बसून सूरतमधील व्यापाऱ्यासोबत हिऱ्यांच्या विक्रीसंदर्भात बोलणी करत होते. त्याचवेळेस काही इसम अचानक जयेश यांच्या ऑफिसमध्ये घुसले.


ओळख खरी सांगितली

त्यातील एक इसम पोलीस गणवेशात होता, तर दुसऱ्या इसमाने त्याची ओळख पोलीस अशीच केली. यावेळी त्याने आपले ओळखपत्र देखील त्यांना दाखवले. या सगळ्यांनी एका इसमाला बकोटीला पकडून आणले होते. या इसमाविरुद्ध क्रॉफर्ड मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून आॅफिसमध्ये बसलेला राज नावाचा दलाल देखील एका गुन्ह्यातील आरोपी असल्याचे त्यांनी जयेश यांना सांगितले. प्रत्यक्षात मात्र राजही त्यांनाच सामील होता.
हिरे घेतले ताब्यात

ऑफिसमध्ये शिरताच त्यांनी राज याला मारहाण केल्याचे दाखवले. आतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले. एवढ्यावर न थांबता या पोलीस कर्मचाऱ्यांनी जयेश यांच्याकडील हिरे देखील चोरीचे असून ते ताब्यात घेण्यास आम्ही आलो आहोत, असा बनाव केला.


गाडीतून दिले उतरून

जयेश यांनी हिरे आपले आहेत, असे सांगूनही त्यांनी जयेश यांचे काहीही ऐकून घेतले नाही. या हिऱ्यांची रक्कम थोडीथोडकी नसल्याने जयेश यांनी हिरे ताब्यात घ्यायचे असतील, तर मला देखील पोलीस चौकीला सोबत घेऊन चला, अशी विनंती या पोलिसांना केली. त्यानुसार दोघांनी जयेश यांना गाडीत बसवले खरे, पण बोरीवली पश्चिमेकडील राजेंद्र नगरजवळ गाडीतून उतरून दिले.

त्यानंतर जयेश यांनी पोलीस अधिकारी मित्राकडे फोनवरून चौकशी केली असता, असा कुठलाही गुन्हा पोलीस ठाण्यात नोंदवला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर जयेश यांनी तत्काळ बोरीवली पोलीस ठाण्यात हिरे चोरीची तक्रार नोंदवली.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे बोरीवली पोलिसांनी या तिघांनाही अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना ५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणी आम्ही दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून चौघा आरोपींना अटक केली आहे. तर दोन आरोपी फरार आहेत. त्याचप्रमाणे आरोपींकडून १२ लाखांचा मुद्देमालही जप्त केला आहे.
- विक्रम देशमाने, डीसीपी, झोन ११हे देखील वाचा -

प्राध्यापकांना हजारोंचा गंडा घालणारा 'विद्यार्थी'!डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.