पुन्हा झाला डॉक्टरवर हल्ला, केईएममध्ये ब्लेडने वार

KEM Hospital
पुन्हा झाला डॉक्टरवर हल्ला, केईएममध्ये ब्लेडने वार
पुन्हा झाला डॉक्टरवर हल्ला, केईएममध्ये ब्लेडने वार
See all
मुंबई  -  

राज्यभरातील सरकारी रुग्णालयांची सुरक्षा वाढवण्यात आली. शिवाय पालिकेने आत्तापर्यंत खाजगी सुरक्षेवर सुमारे १०० कोटी खर्चही केले. येत्या वर्षभरासाठी ११ कोटी खर्चही प्रस्तावित केला आहे. असं असलं तरीही अद्याप डॉक्टरांवरचे हल्ले काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. रविवारी रात्री केईएमच्या डॉक्टरांवर एका रुग्णाने चक्क सर्जिकल ब्लेडने हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात डॉक्टर तरुण शेट्टी (26) जखमी झाले असून, या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी सुनील बामळे (22) नावाच्या तरुणाला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रविवारची रात्र असली तरीही केईम रुग्णालयात चांगलीच वर्दळ होती. मध्यरात्रीच्या सुमारास सुनील बामणे नावाचा तरुण ओपीडीमध्ये आला. आपल्याला मारहाण झाल्याचं त्याने डॉक्टरांना सांगितलं. डॉक्टरांनी सुरुवातीला त्याला तपासलं. मात्र नंतर ते दुसऱ्या एका सिरीअस रुग्णाकडे वळले. त्यामुळे दारूच्या नशेत असलेल्या सुनीलला डॉक्टरांनी बराच वेळ थांबवून देखील आपल्याकडे लक्ष न दिल्याचा राग आला आणि तो डॉक्टर तरुण शेट्टींवर धावून गेला. त्याने डॉक्टरांना मारहाण तर केलीच पण तेवढ्यावर न थांबता त्याने तिथलेच एक सर्जिकल ब्लेड घेऊन डॉक्टरांच्या हातावर वार केला.

या प्रकरणी आम्ही आरोपी सुनील बामळे याला भादंवि कलम 324, 332 , 504 कलमांतर्गत अटक केल्याची माहिती भोईवाडा पोलिसांनी दिली आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.