COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,09,215
Recovered:
47,07,980
Deaths:
79,552
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
37,656
1,657
Maharashtra
5,19,254
39,923

डॉली बिंद्रा विरोधात आणखी एक गुन्हा दाखल

खारमधल्या एका नामकिंत जिममध्ये मित्राचे अडकलेले पैसे मागण्यासाठी गेलेल्या डॉलीनं गोंधळ घातला. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केला असून तिला कधीही अटक होण्याची शक्यता आहे.

डॉली बिंद्रा विरोधात आणखी एक गुन्हा दाखल
SHARES

वादग्रस्त स्वभावामुळे कायम चर्चेत राहणारी आणि बिग बॉस फेम अभिनेत्री डॉली बिंद्रा विरोधात खार पोलिस ठाण्यात  गुन्हा नोंदवण्यात आला आहे. खारमधल्या एका नामकिंत जिममध्ये मित्राचे अडकलेले पैसे मागण्यासाठी गेलेल्या डॉलीनं गोंधळ घातला. व्यवस्थापक जागेवर नसल्यामुळे जिममध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह इतर नागरिकांना डॉलिनं डांबून ठेवलं. याप्रकरणी जिमच्या व्यवस्थापकांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली. 


नेमका काय घडलाय प्रकार?

डॉलीच्या मित्रानं खारच्या पी.डी. हिंदुजा जंक्शन इथल्या व्ही.सी जिम अॅड फिटनेसमध्ये पैसे भरले होते. मात्र काही कारणास्तव त्यानं अॅडमिशन मागे घेत जिम व्यवस्थापनाकडे भरलेले पैसे मागितले. मात्र त्यावर जिमच्या व्यवस्थापकांनी आक्षेप घेतला होता. पैसे परत मिळत नसल्यामुळे त्याने डॉलीकडे याबाबत मदत मागितली. त्यावेळी डॉलीनं २१ जानेवारी २०१९ रोजी खार इथल्या जिममध्ये जाऊन गोंधळ घातला. ऐवढ्यावरच न थांबता तिनं व्यवस्थापक जागेवर नसल्यामुळे जिममधील कर्मचाऱ्यांना आणि इतर नागरिकांना काही तास जिममध्ये कोंडून ठेवत धमकावले.  याप्रकरणी जिम व्यवस्थापकानं दिलेल्या तक्रारीनुसार खार पोलिस ठाण्यात नुकताच डॉली विरोधात 341, 501, 504, 506, 447, 34 भा.द.वि कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. 


आधीही गुन्ह्यांची नोंद

तसंच लवकरच पोलिस डॉलीला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात हजर राहण्याबाबतची नोटीस काढणार असल्याची माहिती खार पोलिसांनी दिली. यापूर्वी देखील डॉलीवर कांदिवली, मालाड पोलिस ठाण्यात अशाच प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे डॉली बिंद्राच्या अडचणीत आणखीन वाढ होणार आहे.  हेही वाचा

राज्याच्या माजी महसूलमंत्र्यांच्या नावानं जमिन घोटाळा

रवी पुजारीच्या हस्तांतरणास 'या' कारणामुळे लागणार विलंबRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा