राज्याच्या माजी महसूलमंत्र्यांच्या नावानं जमिन घोटाळा

माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नावानं करण्यात आलेला आणखी एक घोटाळा उघडकीस आला आहे. मात्र या घोटाळ्यात संबधित माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा काही एक संबध नाही. तर त्यांच्या नावाचा गैरवापर करत हा जमिन घोटाळा करण्यात आला आहे.

SHARE

राज्यात अनेक घोटाळ्यांचा अद्याप न्याय निवाडा लागला नाही. आता त्यात माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नावानं करण्यात आलेल्या आणखी एका घोटाळ्याची भर पडली आहे. मात्र या घोटाळ्यात संबधित माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा काही एक संबध नसून त्यांच्या नावानं हा जमिन घोटाळा करण्यात आला आहे.  मुंबईच्या आझाद मैदान पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सोलापूरातून संतोष दगडू मांजरे (४८) या आरोपीला अटक केली आहे. जवळपास दीड वर्ष पोलिस मांजरेच्या शोधात होते. 


काय आहे प्रकरण?

सोलापूरच्या मोहोळचा राहणारा असलेला आरोपी संतोष दगडू मांजरे (४८) याची 2016 मध्ये तक्रारदार खुशलचंद पुणेकर यांच्याशी ओळख झाली होती. खुशलचंद हे पुण्यातील बड्या व्यापाऱ्यांपैकी एक आहेत. दरम्यान 2016 मध्ये खुशलचंद  हे पुण्यात का जागेच्या शोधात होते. त्यावेळी संतोष यांनं खुशलचंद यांची ओळख वनमाला खरात हिच्याशी करून दिली. 

वनमाला खरात हिनं तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी ओळख असल्याची बतावणी केली. तसंच बारामतीमधील सरकारी कोट्यातील सहा एकरचा प्लॉट पाच लाख 36 हजार रुपयांमध्ये मिळवून देऊ, पण त्यासाठी सात लाख 15 हजार रुपये खर्च येईल, असं देखील सांगितलं. 


फसवणूकीप्रकरणी गुन्हा दाखल

आरोपी महिलेनं संतोष मांजरेच्या संगनमतानं फसवणूक करून सव्वा सहा लाख रुपये घेतले आणि जमीन न देता फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचं पुणेकर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी 2017 मध्ये गोवंडी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.

पुणेकर यांनी आरोपी मांजरे याच्या खात्यावर 17 वेळा पैसे जमा केले होते. याप्रकरणी वनमाला हिला अटक करण्यात आले. याप्रकरणी आरोपपत्रही दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मांजरेने 2017 मध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पण 13 डिसेंबर, 2017 मध्ये उच्च न्यायालयानं त्याचा अर्ज फेटाळल्यानंतर पोलिस त्याचा शोध घेत होते. अखेर तो पोलिसांच्या हाती लागला. 


पोलिसांना गुंगारा देण्यासाठी शेतात झोपायचा

मांजरेला पकडण्यासाठी पोलिस पथक अनेकवेळा मोहोळला जाऊन आले. पण तिथं तो पोलिसांना सापडला नाही. अखेर पोलिसांनी सामान्य गावकरी बनून त्याच्यावर पाळत ठेवली. त्यावेळी तो अटक टाळण्यासाठी शेतात झोपायचा हे पोलिसांना कळालं. त्यानंतर मोठ्या शिताफीनं पोलिसांनी त्याला अटक केली. मांजरे विरोधात सोलापूर, लोणंद येथे ही गुन्ह्यांची नोंद आहे. तर नुकताच मुंबईच्या आझाद मैदान पोलिस ठाण्यात ही फसवणूकीचा एक अर्ज देण्यात आला आहे. फसवणूकीच्या पैशातून मांजरेनं बंगला बांधल्याचं तपासात पुढे आले आहे. हेही वाचा

पश्चिम रेल्वेसाठी २८१५ सीसीटीव्ही कॅमेरे मंजूर

रवी पुजारीच्या हस्तांतरणास 'या' कारणामुळे लागणार विलंबसंबंधित विषय
ताज्या बातम्या