Advertisement

पश्चिम रेल्वेसाठी २८१५ सीसीटीव्ही कॅमेरे मंजूर

पश्चिम रेल्वेने दिवसेंदिवस वाढणाऱ्या गर्दीवर लक्ष ठेवून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सतर्क राहण्याकरता सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेतला होता. याला आता मंजूरी मिळली असून, आॅगस्ट अखेरपर्यंत पश्चिम रेल्वेच्या एकूण ३२ रेल्वे स्थानकांवर २ हजार ८१५ सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वेसाठी २८१५ सीसीटीव्ही कॅमेरे मंजूर
SHARES

पश्चिम रेल्वेने दिवसेंदिवस वाढणाऱ्या गर्दीवर लक्ष ठेवून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सतर्क राहण्याकरता सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेतला होता. याला आता मंजूरी मिळली असून, आॅगस्ट अखेरपर्यंत पश्चिम रेल्वेच्या एकूण ३२ रेल्वे स्थानकांवर २ हजार ८१५ सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. या अंतर्गत चर्चगेट ते विरार स्थानकांवर २ हजार ७२९ आणि सुरत येथे ८६ सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत.


चोरट्यांना पकडणं सहज शक्य

यंदाच्या अर्थसंकल्पात पश्चिम रेल्वे मार्गावरील एकात्मिक सुरक्षा यंत्रणेसाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या एकात्मिक सुरक्षा यंत्रणेंर्तगत गर्दीच्या ठिकाणी, पादचारी पूल, तिकिट घर, सरकते जिने या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यामुळे प्रवाशांचे मोबाइल चोरणाऱ्यांनाही पकडणं शक्य होणार आहे. विशेष म्हणजे या सीसीटीव्हीमध्ये चेहरा ओळखण्याची विशिष्ट यंत्रणाही असल्याने मोबाइल चोरांसह अन्य गुन्हेगारांना पकडणंही सहज शक्य होणार आहे.


अनुचित प्रकार रोखण्यास मदत

चर्चगेट, मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे टर्मिनस, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, बोरीवली, दहिसर, वसई रोड या पश्चिम रेल्वे मार्गावरील जास्त गर्दीच्या स्थानकांवर सर्वाधिक सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. याआधारे स्थानकांवरील गर्दीवर लक्ष ठेवून कोणताही अनुचित प्रकार रोखण्यास मदत होणार आहे.



हेही वाचा -

मध्य रेल्वेवरील महिला प्रवाशांसाठी विशेष तिकिट तपासक पथकाची मागणी

खुशखबर! शिवशाही 'शयनयान'च्या तिकीट दरात कपात



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा