मुंबईच्या जुहू परिसरातून कचरा वेचणाऱ्या ८ वर्षाच्या मुलीचे अपहरण करून अत्याचार करणाऱ्या आरोपीला शिवडी पोलिसांनी अटक केली आहे. इरफान खान असे या आरोपीचे नाव आहे. जुहू परिसरातून या मुलीचे आरोपीने अपहरण केले. मात्र शिवडीतील हाजीबंदर रोड परिसरात नाकाबंदी दरम्यान पोलिसांना पाहून आरोपीने मुलीला सोडून जंगलात पळ काढला. पोलिसांनी मुलीच्या चौकशी केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
विलेपार्लेच्या नेहरूनगर झोपडपट्टी परिसरात पीडित ८ वर्षाची मुलगी ही राहते. घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळेती कचऱ्याच्या पिशव्या वेचण्याचे काम करते. दरम्यान काल रात्री आरोपीला पीडित मुलगी एकटीच फिरताना आढळून आली. त्यावेळी संधीपाहून आरोपीने मुलीला फूस लावून गाडीवर बसवून अपहरण केले. मुलीच्या आई-वडिलांना अनोळखी व्यक्तीच्यासोबत मुलीला पाहिल्याचे कळाल्यानंतर त्यांनी जुहू पोलिसात तक्रार नोंदवली. जुहू पोलिसांनी मुख्य नियंत्रण कक्षाला माहिती दिल्यानंतर मुख्य नियंत्रण कक्षाने आरोपीला पकडण्यासाठी सर्व पोलिसांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.
दरम्यान शिवडी पोलिस ठाण्याच्या हाजीबंदररोडवर सेंट्रल रेल्वे ग्राऊडजवळ एलबीएस काँलेज परिसरात पोलिसांनी नाकाबंदी लावली होती. त्यावेळी स्टुटीवर एक अल्पवयीन मुलगी आणि एक व्यक्ती पोलिसांच्या निदर्शनास आले. मात्र पोलिसांना पाहून स्टुटीवरील व्यक्तीने मुलीला आणि स्टुटीला सोडून शिवडीच्या खारफुटीच्या जंगलात पळ काढला. त्याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. दरम्यान पोलिसांनी अपहरण झालेली मुलगी सापडल्याची माहिती मुख्य नियंत्रण कक्षाला दिली. तपासात आरोपीने मुलीवर अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी आरोपीला अत्याचार आणि पोस्को कलमांतर्गत अटक केली.पोलिसांनी मुलीचा ताबा तिच्या आई-वडिलांना दिला. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे.