१५ किलो सोन्याच्या तस्करीत कोरियन नागरिकाला अटक


१५ किलो सोन्याच्या तस्करीत कोरियन नागरिकाला अटक
SHARES

मुंबईत सोन्याच्या किंमतीने उच्चांक गाठला असताना सोने तस्करांनी पुन्हा डोकी वर काढण्यास सुरुवात केली आहे. मुंबई विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी १५ किलो सोन्याची तस्करी करणाऱ्या एका कोरियन नागरिकाला रंगेहाथ अटक केली आहे. त्याने शर्टाच्या आत घातलेल्या जॅकेटमध्ये विशेष खिसे करून १५ किलो सोन्याची बिस्किटं लपवून आणल्याचे निदर्शनास आले आहे.


इतर आरोपींचा शोध सुरू

या व्यक्तीने हे सोनं हाँकाँगहून मुंबईत आणलं होतं. या सोन्याची किंमत ४ कोटी १५ लाख इतकी असल्याचं कस्टम अधिकाऱ्यांनी सांगितलं. या व्यक्तीने १५ सोन्याची बिस्किटं जॅकेटमध्ये लपवून आणली होती. यातील एक बिस्किट हे १००० ग्रॅमचं आहे. या तस्कराची माहिती कस्टमच्या एअर इन्टेलिजन्स युनिटला मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिता कस्टम अधिकाऱ्यांनी दिली. मात्र या तस्करीमागे असलेल्या इतर आरोपींचा शोध आता कस्टम विभागाने सुरू केला आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा