बनावट एटीएमने वृद्धांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश


बनावट एटीएमने वृद्धांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
SHARES

एमटीएममधून पैसे काढण्यासाठी मदतीचा बहाणा करून एटीएम कार्डची अदलाबदल करणाऱ्या टोळीचा मालाडच्या कुरार पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीने मुंबईसह इतर राज्यात २५ हून अधिक आर्थिक फसवणुकीचे गुन्हे केल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रविण शामजी मिश्रा या मुख्य आरोपीसह त्याचा मित्र नन्हे उर्फ नागेंद्र पांडे याला नुकतीच अटक केली असून अंकित सिंग, ललित पांडे, राहुल दुबे या फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या टोळीने अनेकांना लाखो रुपयांना गंडवल्याची माहिती पोलिस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी दिली.


वृद्धांना कसा गंडवायचा?

मूळचा उत्तर प्रदेशमधील हृदयपूरचा रहिवासी असलेला प्रविण मिश्रा पश्चिम उपनगरातील विविध परिसरातील एटीएमबाहेर त्याच्या साथीदारांसह उभा रहायचा. वृद्ध नागरिक पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये शिरले की त्यांच्या शेजारी उभं राहून मदतीचा देखावा करायचा आणि हातचलाखीने एटीएम कार्डची अदलाबदल करायचा.


बनावट एटीएमची अदलाबदली

याचवेळेस तो वृद्ध बँक ग्राहकांच्या एटीएमचा पीन नंबर देखील चोरून बघायचा. अशा तऱ्हेने हे ग्राहक एटीएममधून बाहेर पडताच तो काही वेळाने येऊन पुन्हा त्याच एटीएम कार्डने पीन नंबरचा वापर करून ग्राहकांच्या खात्यातून पैसे काढायचा. बँक ग्राहकांना गंडवण्यासाठी त्याने विविध नामकिंत बँकांचे बनावट एटीएमकार्ड बनवून घेतले होते.


सीसीटीव्हीतून काढला माग

उपनगरात अशा प्रकारे फसवणुकीच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली होती. दरम्यान कुरार पोलिसांना मिळालेले सीसीटीव्ही फुटेजाच्या मदतीने पोलिसांनी प्रवीणचा माग काढत त्याला नालासोपारा इथून २५ फेब्रुवारी रोजी अटक केली.


ठिकठिकाणी गुन्हे

पोलिसांनी तपासात प्रवीणच्या नावावर समतानगर पोलिस ठाण्यात ५, तुळींज पोलिस ठाण्यात १ आणि बोईसर पोलिस ठाण्यात एका गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती पुढे आली. यासह गोरेगाव, मालाड, बोरिवली, भिवंडी आणि सूरतमध्येही त्याने अशाप्रकारे बँक ग्राहकांना लुटल्याचं पोलिस चौकशीत सांगितलं.

प्रवीणने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी ४ मार्च रोजी नन्हे पांडे याला उत्तर प्रदेशातून अटक केली. तर अंकित सिंग, ललित पांडे, राहुल दुबेसह इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.हेही वाचा-

पैशाच्या वादातून वेश्येची हत्या, १२ तासांत आरोपी जेरबंदRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा