पैशाच्या वादातून वेश्येची हत्या, १२ तासांत आरोपी जेरबंद

एका तरूणाने वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेची ४ मार्च रोजी हत्या केली होती. या हत्येचा अवघ्या १२ तासांमध्ये छडा लावत माता रमाबाई पोलिस ठाण्यातील पोलिसांनी या तरूणाला जेरबंद केलं.

पैशाच्या वादातून वेश्येची हत्या, १२ तासांत आरोपी जेरबंद
SHARES

पैशाच्या वादातून डोंगरी परिसरात राहणाऱ्या एका तरूणाने वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेची ४ मार्च रोजी हत्या केली होती. या हत्येचा अवघ्या १२ तासांमध्ये छडा लावत माता रमाबाई पोलिस ठाण्यातील पोलिसांनी या तरूणाला जेरबंद केलं. अब्दुल हमीद अन्सारी (२२) असं या आरोपीचं नाव असल्याची माहिती पोलिस उपायुक्त मनोजकुमार शर्मा यांनी दिली.


काय आहे प्रकरण?

सॅण्डहर्स्ट रोडच्या डोंगरी परिसरातील अन्सारी बिल्डिंगमध्ये राहणारा अब्दुल अन्सारी सागर जंक्शनजवळील गारमेंटमध्ये टेलरचं काम करायचा. अब्दुल या खोलीत एकटाच रहात असल्याने तो अधून ग्रँड रोड परिसरातील वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या भागात अमिना खान नावाच्या वेश्येकडे जायचा. ४ मार्च रोजी अब्दुल नेहमीप्रमाणे अमिनाकडे गेला. त्यावेळी अमिनाने अब्दुलच्या पॅण्टच्या खिशातील ९ हजार रुपये त्याच्या न कळत काढून घेतले.



हत्या करून पळ काढला

ही बाब अब्दुलच्या लक्षात आल्यावर त्याने अमिनाकडे पैशांची मागणी करू लागला. मात्र अमिना पैसे देण्यास विरोध करत खोलीबाहेर पडली. त्यावेळी राग अनावर झालेल्या अब्दुलने अमिनाला मारण्यासाठी चाकू विकत घेऊन तिचा पाठलाग सुरू केला. पहाटे ४ वाजेच्या सुमारास अमिना सेंट जाॅर्ज गल्लीतील धन्यवाद गेटजवळ पोहोचल्यानंतर तिथं कुणीही नसल्याचं पाहून त्याने अमिनाची हत्या केली आणि चाकू तिथंच टाकून पळ काढला.


सीसीटीव्हीमुळे हाती आला

या घटनेची माहिती माता रमाबाई पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. अमिनाच्या मृतदेहापासून काही अंतरावरच रक्ताने माखलेला चाकू पोलिसांना सापडला. परिसरातील सीसीटीव्ही तपासल्यावर घाबरलेल्या अवस्थेतील एक व्यक्ती टॅक्सीत बसताना पोलिसांना आढळून आलं. ती टॅक्सी ज्या ज्या भागातून गेली. त्या मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेजचा पोलिसांनी तपास केला. त्यानुसार घाबरलेली व्यक्ती डोंगरी परिसरात उरतल्याचं पोलिसांना फुटेजमध्ये दिसलं.


गुन्ह्याची कबुली

या संशयित आरोपीचं स्केच बनवून पोलिसांनी डोंगरी परिसरात त्याचा शोध सुरू केला. त्यानंतर खबऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी ५ मार्च रोजी अब्दुलला संशयित म्हणून ताब्यात घेतलं. अब्दुलकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्यांची कबुली दिली.



हेही वाचा-

गुजरातमध्ये तरुणाला पेटवणाऱ्याच्या मुंबई पोलिसांनी आवळल्या मुसक्या

गँगस्टर रवी पुजारीकडून रेमो डिसोझाला खंडणीसाठी धमकी



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा