रेल्वेचे पार्ट्स चोरणारा अटकेत

 Pali Hill
रेल्वेचे पार्ट्स चोरणारा अटकेत
रेल्वेचे पार्ट्स चोरणारा अटकेत
See all

मुंबई - कुर्ला रेल्वे पोलीस प्रशासनानं रेल्वे पार्टची चोरी करणाऱ्या चोराला बेड्या ठोकल्यात. अभैय्य सतंम असं या आरोपीच नाव असून, त्याने अनेकदा रेल्वेतील पार्टची चोरी केल्याचे उघडकीस आलंय. कुर्ला, ठाणे, पनवेल, दादर या भागात याने चोरी केल्याचही निष्पण्ण झालं. हा चोर रेल्वेचे पार्ट चोरी करून विकत असे. यामुळे रेल्वेला नुकसान तर होत होतेच मात्र रेल्वेत बिघाडही होत असल्याचं रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आलं. पार्टची चोरी नेमकी कोण करतंय याचा शोध घेण्यासाठी सुरेश अत्री यांच्या नेतृत्वाखाली एक टीम नेमण्यात आली आणि अखेर या टीमला या चोराला पकडण्यात यश आलं.

Loading Comments