मुलुंडमध्ये महिलेची आत्महत्या

 Vaishali Nagar
मुलुंडमध्ये महिलेची आत्महत्या
मुलुंडमध्ये महिलेची आत्महत्या
See all

वैशालीनगर - मुलुंडमधील वैशालीनगरमध्ये राहणाऱ्या एका महिलेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी घडला. वैशालीनगरच्या सुनीता आनंद सोसायटीमध्ये राहणाऱ्या प्रतिक्षा संधू (27) या महिलेने आपल्या राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रतिक्षाचा सहा महिन्यापूर्वीच घटस्फोट झाला होता. त्यानंतर आता एक महिन्यापूर्वीच तिचा रितेश मोटवान या तरुणाशी पुनर्विवाह झाला होता. तसेच प्रतिक्षा स्वतः ईसीएस या खाजगी कंपनीत कामाला देखील होती. 

रविवारी रितेश पुण्यामध्ये होता. रविवारी रात्रीच प्रतिक्षाने रितेशला फोन करून आपली मनस्थिती ठीक नसल्याचे सांगितले आणि रितेशला मुंबईत येण्यास सांगितले. रितेशनेही तातडीने मुंबईच्या दिशेने धाव घेतली. परंतु रितेश येण्याआधीच प्रतिक्षाने आपली जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी मुलुंड पोलीस अधिक तपास करत आहेत.

Loading Comments