सुशांत प्रकरणात चुकीची माहिती पसरवणाऱ्या वकिलाला दिल्लीतून अटक

असताना विभोर यांनी वारंवार चुकीचे मेसेज सोशल मिडियावर टाकून अफवा पसवण्याचा प्रयत्न केलाअसा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.

सुशांत प्रकरणात चुकीची माहिती पसरवणाऱ्या वकिलाला दिल्लीतून अटक
SHARES

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत असताना. सुशांत प्रकरणात  मुंबई पोलिसांची जाणूनबूजुन बदनामी केल्याची घटना ताजी असतानाच, आता सुशांत सिंह आत्महत्या आणि दिशा सालीयान प्रकरणात चुकीची माहीती पसरवल्या प्रकरणी सायबर पोलिसांनी दिल्लीतून एका वकिलाला अटक केली आहे. विभोर आनंद असे या आरोपीचे नाव असल्याची माहिती सह पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली.

सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान आत्महत्या प्रकरणात दिल्लीचे  वकिल विभोर आनंद यांनी वारंवार सोशल मिडियावर वादग्रस्त कमेंट केले होते. या दोघांची हत्याच झाल्याचा दावा देखील सोशल मिडियाच्या माध्यमातून केला होता. मात्र सीबीआयच्या तपासात देखील सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात कोणताही संशयास्पद गोष्ठ घडली नसल्याचे सीबीआयने स्पष्ट केले. त्यामुळे यावरून मुंबई पोलिसांचा तपास हा योग्य पद्धतीने सुरू होता. असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. मात्र असे असताना विभोर यांनी वारंवार चुकीचे  मेसेज सोशल मिडियावर टाकून अफवा पसवण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचाः- प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 'ही' टॅक्सी धावणार रस्त्यावर

या प्रकरणी मुंबई पोलिसांनी सुशांत प्रकरणात अफवा आणि चुकीची माहिती पसरवणाऱ्यांविरोधात सायबर पोलिसात नुकतेच दोन गुन्हे दाखल केले होते. या गुन्ह्यात विभोर यांना मुंबई पोलिसांनी गुरूवारी दिल्लीतून अटक केली. विभोर यांना दिल्लीतील न्यायालयात हजर करून ट्रांजिस्ट रिमांडवर त्यांना मुंबईत आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.  

हेही वाचाः- महाराष्ट्र किती मोठं राज्य, माहीत तरी आहे का? सुप्रीम कोर्टाने ‘त्यांना’ सुनावलं

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा