Advertisement

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 'ही' टॅक्सी धावणार रस्त्यावर


प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 'ही' टॅक्सी धावणार रस्त्यावर
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, अनेक ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीनं अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत. अशातच मुंबईची वाहतूक सेवा सुरू झाली आहे. त्यामुळं प्रवाशांच्या सुरक्षेसाठी टॅक्सीचालक तसंच, वडाळा आरटीओ कार्यालय आणि 'युनायटेड वे मुंबई' या संस्थेच्या एकत्रित प्रयत्नाने 'कोविड रेडी टॅक्सी' ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. 

या संकल्पनेच्या माध्यमातून मुंबईतील जवळपास १५० काळ्या-पिवळ्या टॅक्सींन कोरोनाच्या दृष्टीनं सुरक्षापूर्ण तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी संपूर्ण निर्जंतुकीकरण, आयसोलेशन स्क्रीन सेटअप तसेच कोविड रेडीनेस किट अशी त्रिसूत्री तयार करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेत सर्वच क्षेत्रात, विशेष करून नागरिकांची सर्वाधिक वर्दळ असलेल्या वाहतूक क्षेत्रात सुरक्षेच्या दृष्टीने सर्वतोपरी काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

'युनायटेड वे मुंबई' या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेत 'कोविड रेडी टॅक्सी' ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत रेडीनेस किटमध्ये पुन्हा वापरता येण्याजोगा ६ थरांचा फेस मास्क, जंतुनाशक स्प्रे, दीड लिटर हँड पंप स्प्रे बाटली, पाच लिटर हँड सॅनिटायझरचा कॅन, टॅक्सीच्या साफसफाईसाठी मायक्रो फायबर कपडा आणि हात स्वच्छ धुण्यासाठी कागदी साबणाच्या १० पट्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. 

टॅक्सीचालकांनाही कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण रस्ते सुरक्षिततेतील १० नियमांवर आधारित असणार आहे. 'या संकल्पनेअंतर्गत सर्वप्रथम १५० टॅक्सी कोविड रेडी करण्याचा मानस असून, या सर्व टॅक्सीचालकांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा