वकिलांचे पोलिसांच्या विरोधात आंदोलन


वकिलांचे पोलिसांच्या विरोधात आंदोलन
SHARES

मालाड - बोरीवली, दिंडोशी, अंधेरी आणि वांद्रे इथल्या कोर्टातल्या वकिलांनी बुधवारी कामबंद आंदोलन केले. कुरार पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक लांडगे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या समोरच रविवारी दिलीप गुप्ता या वकिलाच्या कानशिलात लगावत शिवीगाळही केली. त्या विरोधात या वकिलांनी आज कामबंद आंदोलन करत पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यासह ज्या अधिकाऱ्याने वकिलाच्या कानाखाली भडकावली त्यांच्याविरोधात कारवाई व्हावी अशी मागणी वकील डी. के. पांडे यांनी केली.

तर बोरीवली कोर्टातल्या वकिलांचं म्हणणं आहे की, पोलिसांची मनमानी सहन केली जणार नाही. याच्याविरोधात कोर्टात धाव घेऊ असा इशाराही दिला आहे. तसेच कुरार पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई केली जावी अशी मागणी देखील केली.

मिळालेल्या माहितीनुसार अॅड. दिलीप गुप्ता हे गोरेगाव (प.) इथल्या जवाहरनगरमधील राहणारे आहेत. ते कलम 302 चे एक प्रकरण हाताळत होते. 26 मार्चला सकाळी त्यांच्या घरी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत दिलीप हे देखील कुरार पोलीस ठाण्यात गेले. तेव्हा दिलीप देखरेख करत असलेल्या प्रकरणाची माहिती तिथल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने विचारली. मात्र आपल्याला त्याबद्दल काहीच माहीत नसल्याचे दिलीप यांनी सांगितले. त्यामुळे संतापलेल्या पोलीस अधिकाऱ्याने दिलीप यांच्या कानशिलात लगावत त्याना शिवीगाळ देखील केली होती. याची सूचना मिळताच वकिलांचा समूह पोलीस ठाण्याबाहेर जमला होता.

याची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त सुभाष वेले तिथे पोहचले. तेव्हा त्यांनी वकिलांशी बातचित करून योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचं आश्वासन त्यांना दिलं होतं. त्यासह फिर्यादी वकील दिलीप गुप्ता यांचा जबाब देखील नोंदवून घेतला होता.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा