अक्सा बीचवर आत्महत्येचा प्रयत्न फसला

 Malad
अक्सा बीचवर आत्महत्येचा प्रयत्न फसला

आक्सा - मालाड पश्चिमेकडील अक्सा समुद्रकिनारी आत्महत्या करायला आलेल्या एका तरुणीला सोमवारी दुपारी जीवरक्षकांनी वाचवलं. 24 वर्षीय तरुणी अक्सा समुद्रकिनारी पाण्यात जात असल्याचं तेथे तैनात असलेल्या जीवरक्षकाला दिसलं. जीवरक्षकांनी तात्काळ समुद्रात धाव घेऊन तरुणीला वाचवलं. जीवरक्षकांनी त्या मुलीला पोलिसांच्या ताब्यात दिलं. ही मुलगी कांदिवलीतील गणेशनगर परिसरात राहते. तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला याबाबत अधिक तपास सुरू असल्याचं मालवणी पोलिसांनी सांगितलं.

Loading Comments