मध्य रेल्वेवर स्टंटबाज पुन्हा सक्रिय


मध्य रेल्वेवर स्टंटबाज पुन्हा सक्रिय
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेलं लॉकडाऊन शिथिल केलं जातं असून, सर्वसामान्य प्रवाशांसाठी १ फेब्रुवारीपासून लोकल सेवा सुरू झाली आहे. परंतु, पुन्हा  मध्य रेल्वेवर गेले काही महिने गायब झालेले स्टंटबाज पुन्हा सक्रिय झाले आहेत. या स्टंटबाजांमुळे इतर प्रवाशांच्याही जीवाला धोका निर्माण होत आहे.

सायन ते दादर स्थानकादरम्यान सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास एक तरुण धावत्या लोकलमध्ये स्टंट करत असल्याचा प्रकार घडला. त्यानंतर स्टंटबाजांना पकडण्यासाठी रेल्वे पोलिसांनी कंबर कसली आहे. मध्य रेल्वेच्या सुरक्षा बळाकडून स्टंटबाजाचा शोध सुरू आहे. कोरोनाकाळात लोकल सेवा बंद होती. जूनमध्ये अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू झाली.

१ फेब्रुवारीपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू झाली. त्यामुळे आता स्टंटबाजांचा सुळसुळात सुरू आहे. स्टंटबाज लोकल प्रवासात थरथराक स्टंटबाजीचे व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर अपलोड करतात; मात्र यामुळे स्वतःच्या आणि इतर प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. आता रेल्वे पोलिस स्टंटबाजांवर कडक कारवाई करणार आहे. 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा