दिवा स्थानकात प्रवाशाला मारहाण, थोडक्यात वाचला डोळा


SHARE

मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकात लोकलमध्ये चढताना लोकलच्या दरवाजात उभं राहणाऱ्या प्रवाशांनी एक प्रवाशाला जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विनायक चव्हाण असं या प्रवाशाचं नावं आहे. दिव्याहून सीएसएमटीकडे येणारी लोकल पकडत असताना त्याला मारहाण झाली. या घटनेत विनायकच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, ठाणे रेल्वे पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.


लोकलमध्ये चढताना केली मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ८.३९ वाजताच्या सुमारास विनायक दिव्याहून सीएसएमटीकडे येणारी लोकल पकडत होते. त्यावेळी लोकलच्या दरवाजात उभ्या असलेल्या काही प्रवाशांनी त्यांना लोकलमध्ये चढू न देता त्यांच्यासोबत वाद घालत त्यांना मारहाणही केली. यामध्ये विनायक यांच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


हेही वाचा -

लोअर परळचा पूल संध्याकाळपर्यंत होणार खुला

संबंधित विषय
ताज्या बातम्या