लाँकडाऊनमुळे 150 रुपये परत करू न शकलेल्या मिञाला दगडाने ठेचून मारलं...

लाँकडाऊनमुळे रियाजच्या ही हाताचे काम सुटले होते. त्यामुळे हुसेनचे पैसे द्यायला रियाजकडे पैसे नव्हते.

लाँकडाऊनमुळे 150 रुपये परत करू न शकलेल्या मिञाला दगडाने ठेचून मारलं...
SHARES
मुंबईच्या शिवडी परिसरात उसने घेतलेले 200 रुपये परत देत नसल्याच्या रागातून मिञानेच मिञाची दगडाने ठेचून हत्या केली आहे. रियाज रफीक शेख असे या मृत तरुणाचे नाव आहे.  या प्रकरणी शिवडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून मारेकरी हुसेन तयबी शेख उर्फ चुलबुल याला अटक केली आहे.


शिवडीच्या रेती बंदर परिसरात हे दोघे ही रहात असून भाऊच्या धक्क्यावर हमाली करायचे. काही दिवसांपूर्वी रियाजने हुसेनकडून  दिडशे रुपये उधारीवर घेतले होते. माञ अनेक दिवसांपासून पैसे मागून सुद्धा रियाज पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. दरम्यान कोरोनामुळे राज्यभरात लाँकडाऊन सुरू झाले आणि हुसेनच्या हाताचे काम सुटले. रोजच्या हमालीवर हुसेनला 500 रुपये खर्चाला मिळत होते. माञ काम बंद झाल्यामुळे त्याच्यावर उपासमारीची वेळ आली होती. अशातच त्याने रियाजकडे पैशांसाठी तगादा लावला. माञ लाँकडाऊनमुळे रियाजच्या ही हाताचे काम सुटले होते. त्यामुळे हुसेनचे पैसे द्यायला रियाजकडे पैसे नव्हते. यावरून दोघांमध्ये दोन दिवसांपूर्वी भांडणं झाली होती. त्यावेळी हुसेनने रियाजला धमकावले होते.


दरम्यान दोनच दिवसांनतर रियाजचा मृतदेह माझगाव येथे सिमेंट पाई येथे रक्ताच्या थारोळ्यात आढळला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चौकशीत तो मृतदेह रियाजचा असल्याचे कळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. रियाजचा भाऊ शफिककडे चौकशी केल्यानंतर पैशांवरून रियाज आणि हुसेनचे दोन दिवसापूर्वी झालेले भांडणाची माहिती त्याने पोलिसांना दिली. पोलिस हुसेनच्या शोधात असतानाच, त्याने पळून गेला आणि पोलिसांचा संशय खरा ठरला. पोलिस मोबाइलच्या टाँवर लोकेशननुसार  आरोपीचा शोध घेतात, हे अनेक मालिका आणि चिञपटात पाहिले आहे. माञ समुद्रात पोलिसांना मोबाइलचे टाँवर लोकेशन सहसा मिळत नाही, म्हणूनच हुसेन भाऊच्या धक्का येथील समुद्रात एका बोटीत लपला होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली. उधारीच्या दीडशे रुपयांसाठी त्याने रियाजला मारल्याची कबूली त्याने पोलिसांना दिल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा