COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,17,121
Recovered:
56,54,003
Deaths:
1,12,696
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,390
575
Maharashtra
1,47,354
9,350

मुंबईत २ दिवसात २३ हजार गाड्या पोलिसांनी केल्या जप्त

सोमवारी पोलिसांनी दिवसभरात तब्बल ६ हजार ८० वाहने जप्त केली आहेत.

मुंबईत २ दिवसात २३ हजार गाड्या पोलिसांनी केल्या जप्त
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर वचक बसवण्यासाठी पोलिसांनी मुंबईत बाहेर फिरणाऱ्यांच्यागाड्या जप्त करण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार मुंबईत मागील दोन दिवसात पोलिसांनी तब्बल २३ हजार गाड्या जप्त केल्या आहेत. या सर्वांवर पोलिसांनी लाँकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी १८८ नुसार कारवाई करण्यात आली आहे.तर सोमवारी पोलिसांनी दिवसभरात तब्बल ६ हजार ८० वाहने जप्त केली आहेत.

हेही वाचाः- Terrorist threat मुंबईत हाय अलर्ट, दहशतवाद्यांच्या धमकीनंतर महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवली

लाँकडाऊनमध्ये शिथिलता देताच, नागरिक मोठ्या संख्येने वाहने घेऊन रस्त्यावर गर्दी करू लागले. बहुदा राज्यशासनाच्या अटीचा त्यांना विसरच पडला असावा. दरम्यान अशा बेजबाबदार नागरिकांविरोधात पोलिसांनी आता कडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. मुंबईतल्या ९४ पोलिसांना त्याच्या परिसरातील मुख्य २ मार्गावर सकाळी ४ आणि संध्याकाळी ४ तास नाकाबंदी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार मुंबईत रविवारपासूनच ठिक ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी लावली. बिनकामाचे बाहेर पडण्यावर चाप बसवण्यासाठी पोलिसांनी ही मोहिम सुरू केल्याचे समजते. मागील दोन दिवसाच्या पोलिस कारवाईत  पोलिसांनी तब्बल २३ हजार वाहने जप्त केल्याचे सांगण्यात आले आहेत. त्यात वाहतूक पोलिसांनी १ हजार ८७९ वाहने जप्त  केली आहेत. त्यात तीनचाकी १२८,  टॅक्सी ७०, खासगी वाहने ३५२, दुचाकी १३२९ इतक्या आहेत.  कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश जरी मिळाले असले. तरी धोका अजून टळलेला नाही. ही बाब नागरिकांनी ही विसरून चालणार नाही. राज्य सरकारने नागरिकांना अत्यावश्यक गोष्टींसाठी लागणाऱ्या अनेक परवानग्या दिल्या आहेत. तसेच त्यासाठी काही नियम ही घालून दिलेले आहे. या नियमाचे पालन करणे नागरिकांनी गरजेचे असल्याचे पोलिस उपायुक्त प्रणय अशोक यांनी सांगितले.

हेही वाचाः- यंदा गणेशोत्सवच नाही; 'लालबागचा राजा' मंडळाचा ऐतिहासिक निर्णय

कोविड १९ या महामारीचा धोका कायम आहे. अशा स्थितीत आपण सर्वांनी सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर, शक्यतो घराबाहेर न पडणे, वारंवार हात धुणे या गोष्टी पाळणं आवश्यक आहे असं पोलीस उपायुक्त प्रणय अशोक (ऑपरेशन्स) यांनी हे आवाहन केलं रात्री ९ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी कायम राहणार आहे. मेडिकल इमर्जन्सी असेल तरच संचारबंदीच्या काळात बाहेर पडता येईल. घराबाहेर फिरताना मास्क लावणं अनिवार्य आहे. मार्केट, शॉप्स, बार्बर शॉप्स सुरु ठेवण्याची संमती देण्यात आली आहे. दोन किमीच्या आतच या ठिकाणी जावं असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. व्यायाम करण्यासाठी संमती देण्यात आली आहे. त्यासाठीची मर्यादाही दोन किमीच आहे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं अनिवार्य आहे असंही पोलिसांनी म्हटलं आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा