COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,54,508
Recovered:
56,99,983
Deaths:
1,16,674
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,860
684
Maharashtra
1,34,747
9,798

Terrorist threat मुंबईत हाय अलर्ट, दहशतवाद्यांच्या धमकीनंतर महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवली

गृहमंत्र्यांनी पोलिस महासंचालक आणि पोलिस आयुक्त यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. त्याच बरोबर या फोनचा काढण्याचे आदेश ही दिलेले आहे. मुंबईत अलर्ट जारी करत पोलिसआणि इतर सुरक्षा यंत्रणांना ही सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

Terrorist threat मुंबईत हाय अलर्ट, दहशतवाद्यांच्या धमकीनंतर महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवली
SHARES

मुंबईच्या ताज हाँटेलमध्ये फोनकरून दहशतवाद्यांनी दिलेल्या धमकीची गंभीर दखल घेत, सुरक्षा यंत्रणेला सतर्क राहण्यास सांगण्यात आलेले आहे. त्याच बरोबर मुंबईत सर्व महत्वाच्या ठिकाणी पोलिसांकडून सुरक्षा वाढवलण्यात आलेली आहे. धमकीचा हा फोन पाकिस्तानातून आल्याचा प्राथमिक अंदाज सुरक्षा यंत्रणेकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

हेही वाचाः- यंदा गणेशोत्सवच नाही; 'लालबागचा राजा' मंडळाचा ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानच्या स्टॅक एक्सचेंजवर अतिरेक्यांनी हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच, आता मुंबईच्या ताज हाँटेलवर पून्हा एकदा २६/११ सारखा दहशतवादी हल्ला घडवण्याची धमकी अतिरेक्यांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे ताज हाँटेलसह मुंबईतल्या प्रमुख ठिकाणांच्या सुरक्षेत पोलिसांनी वाढ केली आहे. मुंबईत आधीच कोरोनानं संपूर्ण सुरक्षा यंत्रणा कामाला लागली आहे. या महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन शर्तीचे प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे भारत-चीन मध्येही संबध खराब झाल्यामुळे सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तर पाकिस्तान सीमेवर दहशतावद्यांशी जवान दोन हात करत आहे. अशातच एक नवी डोकेदुखीने सुरक्षा यंत्रणेवर भार कामाला लागली आहे. सोमवारी मध्यरात्री ताज हाँटेलला एक निवावी फोन आला. फोनवर समोरील व्यक्तीने तो लष्कर ए तोयबाचा सदस्य असून आम्ही लवकरच २६/११ सारखा दहशतवादी हल्ला करणार आहोत, परिणामांसाठी तयार रहा असे धमकीवजा संदेश त्याने दिला. त्यानंतर लगेचच दुसरा फोन हा वांद्रेच्या ताज हाँटेलवर करण्यात आला. या फोनची माहिती हाँटेलच्या संबधित अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तातडीने दोन्ही हाँटेलसह मुंबईतल्या प्रमुख ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिलेले आहेत.

हेही वाचाः- Mumbai local: मुंबई लोकलच्या ७०० फेऱ्या, केवळ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठीच

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गृहमंत्र्यांनी पोलिस महासंचालक आणि पोलिस आयुक्त यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. त्याच बरोबर या फोनचा माग काढण्याचे आदेश ही दिलेले आहे. मुंबईत अलर्ट जारी करत पोलिसआणि इतर सुरक्षा यंत्रणांना ही सतर्क राहण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले असल्याचे अनिल देशमुख यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा