राज्यातल्या 'या' जिल्ह्यात CISF आणि CRPFच्या तुकड्या दाखल...

या तुकड्या कुठे तैनात करायच्या याचे सर्व अधिकार त्या त्या जिल्ह्याच्या पोलिस आयुक्तांना दिले आहेत

राज्यातल्या 'या' जिल्ह्यात CISF आणि CRPFच्या तुकड्या दाखल...
SHARES
मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांना आवाहन करून सुद्धा बेजबाबदार पणे काही जण फिरत आहेत. या टवाळखोरांना रोखण्यासाठी पोलिसांनी खूप प्रयत्न केले, माञ संसर्गाच्या विळख्याने पोलिसांना ही सोडले नाही. पोलिसांवरचा दिवसेंदिवस  वाढलेला ताण लक्षात घेऊनच उद्धव ठाकरे आणि गृहमंञ्यांनी केंद्राकडे CISF ची मागणी केली होती. त्यानुसार केंद्राने CISF च्या 3 आणि CRPF च्या 2 अशा पाच तुकड्या महाराष्ट्रात पाठवल्याचे सांगितले जात आहे.



मुंबईसर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. माञ या परिसरात असलेली लोखसंख्या आणि लाँकडाऊनचे उल्लघंन करणाऱ्यांमुळे हा प्रादुर्भाव कमी होत नसल्याचे पुढे आले आहे. कोरोनाचे हाँटस्पाँट असलेल्या ठिकाणी गस्तीवर असलेल्या पोलिसांना ही या महामारीने सोडलेले नाही. राज्यात आतापर्यंत 1328 पोलिस कर्मचारी कोरोनाने ञस्त आहेत. तर आतापर्यंत 12 जणांचा या संसर्ग विषाणूने बळी घेतला आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्या आधीच नियंञणात आणणे गरजेचे आहे. माञ त्यात पोलिसांची भूमिका ही महत्वाची राहणार आहे. माञ पोलिसांवर वाढलेला ताण लक्षात घेऊनच केंद्राने आता CISF आणि CRPF च्या पाच तुकड्या महाराष्ट्रात पाठवलेल्या आहेत.

ईद, सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पाश्वभूमिवर या जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये, त्याच बरोबर पोलिसांना ही विश्रांती मिळावी. या उद्देशाने ही दोन्ही पथक मुंबई, औरंगाबाद, मालेगाव आणि पुणे येथे सुरक्षेसाठी तैनात केली जाणार आहे. माञ जिल्ह्यात या तुकड्या कुठे तैनात करायच्या याचे सर्व अधिकार त्या त्या जिल्ह्याच्या पोलिस आयुक्तांना दिले असून मुंबईच्या पोलिस उपायुक्त प्रणय अशोक यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या प्रत्येक तुकडीत शंभर जवान असणार असून त्यांना त्यामुळे विनाकारण बाहेर पडत असाल तर जरा संभाळून...  
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा