दुकानाबाहेरील गर्दी टाळण्यासाठी आता ग्राहकांना दिले जाणार 'टोकन', पोलिसांचे आदेश


दुकानाबाहेरील गर्दी टाळण्यासाठी आता ग्राहकांना दिले जाणार 'टोकन', पोलिसांचे आदेश
SHARES
मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या काही आटोक्यात येत नाही. सोमवारी दिवसभरात कोरोनाचे 510 नवे रुग्ण आढळले. त्यातच सरकारने दारू विक्रीवरील निर्बंध उठवल्याने दिवसभरात अनेक ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाल्याचे पहायला मिळाले. दुकानाबाहेर होणारी हिच गर्दी रोखण्यासाठी पोलिसांनी आता 'टोकन स्टिस्टम' सुरू केली आहे.

मुंबईत लाँकडाऊनच्या काळात घराबाहेर पडू नका, असे पोलिसांनी किती ही घसा काढून सांगून सुद्धा नागरिक काही ऐकत नाही. म्हणूनच पोलिसांनी आता परिसरातील दुकानदारांना 'टोकन सिस्टम' सुरू करण्यास सांगितले आहे. त्यात ग्राहकांने दुकानदाराला येऊन आपली सामानांची लिस्ट द्यायची. त्यावेळी दुकानदार ग्राहकाला टोकन देणार, ग्राहकाच्या लिस्टनुसार दुकानदार सामान बांधून ते तयार ठेवणार आणि ग्राहकाला फोन करून अथवा वेळ देऊन बोलवणार, अशी ही संकल्पना असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. या टोकन व्यवहार पद्धतीची माहिती स्थानिक पोलिसांनी दुकानदारांना दिली असल्याची माहिती पोलिसांच्या अधिकृत ट्विटरहून देण्यात आली आहे.  माञ हे तर सामानांच झालं, माञ आज दारूविक्री करणाऱ्याबाहेरील माणसांच्या रांगापाहून त्या ठिकाणी गर्दी पांगवण्यासाठी कोणती नवीन क्लुप्ती लढवणार हे पाहण औत्सुक्याचे ठरेल. 

महाराष्ट्रात कोविड-19 चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. महाराष्ट्रात सद्य स्थितीत कोरोना बाधितांची एकूण संख्या 12,974 पोहोचली असून मुंबईत 9123 रुग्ण आढळले आहेत. ही संख्या लक्षात घेता मुंबईत सोशल डिस्टंसिंगसाठी मुंबई पोलिसांनी नवी घोषणा केली आहे. ज्यामध्ये उद्यापासून मुंबईतील दुकानदारांना ग्राहकांना टोकन द्यावे लागणार आहे. दुकानांबाहेरील गर्दी टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी हा नवा नियम लागू केला आहे. यामुळे दुकानांबाहेर होणारी गर्दी टाळता येईल, असेही सांगण्यात येत आहे.

मुंबईत आज कोरोनामुळे आज 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एकूण 510 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे कोरोना बाधीतांची संख्या 9 हजार 123 वर पोहचली आहे. यापैंकी 1 हजार 908 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर एकूण 361 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात 12,974 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून 548 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहेत. तर 2115 रुग्ण बरे झाल्याचे सांगण्यात येत आहे.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा