Advertisement

समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांच्याविरोधात गुन्हा दाखल


समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांच्याविरोधात गुन्हा दाखल
SHARES
Advertisement
नागपाड्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक शालीनी शर्मा यांच्याशी बोलताना अपमास्पद शब्दांचा वापर करणारे समाजवादी पार्टीचे नेते अबु आझमी यांच्याविरोधात नागपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वी याप्रकरणानंतर शर्मा यांची चेंबूर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली होती.

परराज्यात जाणा-या रेल्वेची योग्यती माहिती न मिळाल्यामुळे 10 हजार मजूर नागपाडा परिसरात जमा झाले होते. या मजुरांना रेल्वे का मिळाली नाही, हा प्रश्न घेऊन  समाजवादी पार्टीचे नेते अबु आझमी यांनी पोलिसांशी वाद घातला. त्यावेळी संतापलेल्या अबु आझमी यांनी त्यांच्या 30 कार्यकर्त्यांसह  जोरदार निदर्शने केली. यामुळे सोशल डिस्टन्सगींचा पुर्ण फज्जा उडाला होता. तसेच यावेळी आझमी यांनी शर्मा यांच्याशी बोलताना अपमानास्पद शब्दांचा वापर केला. त्यावरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कलम - 188, 269, 270, 186, 143, 145, 147, 149,151, 504, 506 भा.दं.वि सह कलम 51(ब) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, सह कलम 2, 3, 4 साथीचे रोग प्रतिबंधक कायद्या अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिस हवालदार रविंद्र निवासे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओही वायरल झाला होता. भारतीय जनता पार्टीचे नेता किरीट सोमय्या यांनी याबाबत ट्वीट करून आझमी यांचा व्हिडीओही अपलोड केला होता. 26 मेला रात्री हा प्रकार घडला होता. त्यानंतर याप्रकरणाने राजकीय रंग प्राप्त केला होता. दरम्यान, काही वरिष्ठ अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मा यांनी स्वतः नागपाड्यातून दुसरीकडे बदली करण्याची विनंती केली होती. त्यानुसार त्यांना चेंबूर येथे त्यांची बदली करण्यात आल्याचे सांगितले. बुरचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक जयप्रकाश भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संबंधित विषय
Advertisement