मुंबई पोलिस आयुक्त आज मुंबईकरांशी संवाद साधणार


मुंबई पोलिस आयुक्त आज मुंबईकरांशी संवाद साधणार
SHARES
देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असताना, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.घरातील अत्यावश्यक साहित्य ही संपत आहेत. त्यात संचार बंदी सुरू असल्यामुळे पोलिसांच्या कारवाईच्या भितीमुळे घराबाहेरलही पडता येत नाही. नागरिकांना पडलेल्या या प्रश्नांची  उत्तर देण्यासाठी आता खुद्द पोलिस आयुक्त परमबिर सिंह हे नागरिकांसमोर येणार आहेत.

कधी ही न थांबणार शहर अशी या मुंबईची ओळख आहे. माञ इतिहासात पहिल्यांदाच कोरोनाच्या विषाणूमुळे ब्रेक लागला आहे. रस्ते ओसाड पडले, दुकाने बंद झाले, कधी नव्हे ते उन्हाळ्यात रेल्वेच्या चारांना ब्रेक लागला आहे. दिवसेंदिवस परिस्थिती चिघळत जात असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. पोलिसांच्या कारवाईच्या भितीने अत्यावश्यक सेवेसाठी ही घराबाहेर पडताना नागरिकांना मुश्किल झाले आहे. अशातच नागरिकांना धीर देणे आणि सहकार्य करण्याचे आवाहन करण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्त परमबिर सिंग नागरिकांशी संवाद साधण्यासाठी येणार आहेत.

मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवर आयुक्त दुपारी 3 ते 4 वा. आँनलाईन येणार आहे. तरी नागरिकांनी त्यांना पडणारे सर्व प्रश्न ट्विटर विचारावेत, त्याची उत्तर स्वत: परमबिर सिंग हे देणार असल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा