राखी सावंतने केला पोलिसांचा एप्रिल फुल?

  Oshiwara
  राखी सावंतने केला पोलिसांचा एप्रिल फुल?
  मुंबई  -  

  मुंबई - अभिनेत्री राखी सावंत हिने मंगळवारी सगळ्यांनाच पळता भुई करून सोडले. एकीकडे सतत टीव्ही आणि इंटरनेटवर राखी सावंतच्या अटकेच्या ब्रेकिंग न्यूज चालत होत्या. तर दुसरीकडे राखी सावंत नेमकी आहे कुठे? हे तिला पकडण्यासाठी थेट पंजाबमधून आलेल्या लुधियाना पोलिसांना देखील माहीत नव्हते. लुधियाना पोलिसांची टीम राखीला पकडण्यासाठी गेली होती. पण लुधियाना पोलिसांना तिचा काहीच अतापताच लागला नाही.  

  लुधियाना पोलीस राखी सावंत विरुद्ध निघालेला अटक वॉरंट बजावण्याकरीता मंगळवारी सकाळी  मुंबईत दाखल झाले होते. ते राखीला पकडण्यासाठी तिच्या ओशिवरा येथील घरीही गेले होते. पण ती तिथे राहत नसल्याचं त्यांना समजलं. दरम्यान, दुसरीकडे राखीने स्वतःला अटक केल्याचा चांगलाच गैरसमज पसरवला. पण खरे तर राखीला अटक झालीच नव्हती. या गोंधळात लुधियाना पोलीस राखीला अटक न करताच पंजाबला निघून गेले. 

  महर्षी वाल्मिकींविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राखी विरोधात लुधियाना कोर्टात खटला सुरू आहे. समन्स पाठवून देखील कोर्टात हजर न राहिल्याने ९ मार्चला राखी विरोधात अटक वॉरंट काढण्यात आलं होता. १० एप्रिलला या खटल्याची पुढील सुनावणी आहे. 

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.