कॉपी राईटप्रकरणी महामुव्हीच्या सीईओला अटक


कॉपी राईटप्रकरणी महामुव्हीच्या सीईओला अटक
SHARES

स्वामित्त्व हक्क उल्लंघनाप्रकरणी महामुव्ही वाहिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय वर्मा यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. मंगळवारी याप्रकरणी त्यांची काही काळ चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी जुहू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. टीआरपीही त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते.

हेही वाचाः- मुंबईतील ७८ टक्के भाडेकरूंना स्वत:च्या घरात जाण्याचे वेध

मंगळवारी गुन्हे शाखेचे पथक वर्मा यांच्याकडे पोहोचले. त्यानंतर काही काळ चौकशी केल्यानंतर समाधानकारक उत्तरे न मिळाल्यामुळे त्यांनी वर्मा यांना अटक केली. कॉपीराईट प्रकरणी एका मोठ्या बॅनरने याप्रकरणी जुहू पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल केल्यानंतर पुढील तपासासाठी हे प्रकरण गुन्हे शाखेला वर्ग करण्यात आले होते. त्याप्रकरणी तपासात वर्मा यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. आरपीप्रकरणीही आरोपपत्रामध्ये महामुव्हीवर आरोप करण्यात आले होते. बीएआरसी ही संस्था भारतीय माहीत व प्रसारण मंत्रालय (एमआयबी) तसेच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ( ट्राय) यांच्या अधिपत्याखाली काम करते.

हेही वाचाः-लवकरच मुंबईत धावणार विनाचालक मेट्रो

या संस्थेने संपूर्ण भारतातील विविध ठिकाणी जवळपास ३ हजार बोरोमिटर्स बसवले असून त्याद्वारे प्रेक्षकांनी पाहिलेल्या पाहिलेल्या कार्यक्रमांवर लक्ष ठेवले जाते व त्याद्वारे विविध चॅनेल्सना रेटींग दिले जाते. बीएआरसीने दिलेल्या रेटिंग्ज नुसार जाहिरातदार जाहिरात प्रसारित करणार्यांना पैसे देतात. टीआरपीमध्ये फेरफार करून फसवणूक केल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम लक्ष केलेल्या चॅनेल्सना होतो आणि अशा प्रकारे फेरफार करून टीआरपी वाढवल्या मुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. याप्रकरणी तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल होता

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा