Advertisement

मुंबईतील ७८ टक्के भाडेकरूंना स्वत:च्या घरात जाण्याचे वेध

मुंबईतील ७८% भाडेकरू २०२१ मध्ये घर खरेदी करण्याच्या प्रयत्नात असल्याचं नोब्रोकर डॉटकॉमच्या ‘इंडिया रिअल इस्टेट रिपोर्ट २०२०’ अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

मुंबईतील ७८ टक्के भाडेकरूंना स्वत:च्या घरात जाण्याचे वेध
SHARES

कोरोना साथीच्या काळात लोकांना त्यांच्यासाठी स्वतः च्या स्वतंत्र घराची गरज प्रकर्षाने जाणवली. त्यामुळेच मुंबईतील ७८% भाडेकरू २०२१ मध्ये घर खरेदी करण्याच्या प्रयत्नात असल्याचं नोब्रोकर डॉटकॉमच्या ‘इंडिया रिअल इस्टेट रिपोर्ट २०२०’ अहवालात नमूद करण्यात आलं आहे. 

सोसायटीत राहण्याची इच्छा असलेल्या खरेदीदारांची संख्याही मुंबईत सर्वाधिक (८२%) आहे. शहरात स्वतंत्र घराची कमतरता असल्याने तसंच वाढीव सुरक्षा आणि सोसायटीत असलेल्या निवासासाठीच्या सोयी यामुळे हा ट्रेंड दिसून येत असल्याचं या रिअल इस्टेट पोर्टलच्या पाहणीतून निदर्शनास आलं आहे. 

मालमत्ता खरेदीतील प्रमुख ट्रेंड्स:

मुंबईत (mumbai) घर शोधणाऱ्यांपैकी बहुतांश (८७%)) लोक रेडी-टू-मूव्ह-इन किंवा रिसेलच्या घरांना प्राधान्य देतात. अंडर-कंस्ट्रक्शन प्रकल्पात गुंतवणूक केलेल्या लोकांना आलेल्या अडचणी पाहता हा एक योग्य पर्याय ठरतो. 

मुंबईतील सुमारे तीन चतुर्थांश (७३%) लोक हे पहिल्यांदा घर खरेदी करण्याचा विचार करत असून बहुतांश खरेदीदार (९२%) कायमस्वरूपी मालमत्ता तर ८% लोक गुंतवणुकीच्या उद्देशाने मालमत्ता खरेदी करत आहेत. नवीन घर खरेदी करताना मुंबईतील जवळपास ६७% नागरिक वास्तूच्या नियमांना त्यांच्या निर्णय प्रक्रियेत महत्त्व देतात. 

मुंबईत मालमत्तेचा शोध घेणाऱ्यांपैकी सर्वाधिक २०% लोक घर खरेदीसाठी १ कोटी किंवा त्यापेक्षा जास्त बजेटचं घर घेण्यास उत्सुक आहेत. यामागे या भागातील प्रॉपर्टीचे वाढीव दर तसंच स्टँप ड्युटीच्या शुल्कात झालेली कपात ही कारणं असावीत असा अंदाज आहे. मुंबईमध्ये १ बीएचके घर शोधणाऱ्या  लोकांची संख्या (४९%) सर्वाधिक आहे. शहराच्या रिअल इस्टेट क्षेत्रावर साथीच्या आजाराचा परिणाम झाल्याने दर चौरस फूट किंमतीत ३.७% एवढी घसरण दिसून आली. हे भारतातील बहुतांश मोठ्या शहराततील ट्रेंडनुसारच आहे.

हेही वाचा- सीएसएमटीच्या पुनर्विकासासाठी 'या' कंपन्या इच्छुक

टॉप रेंटल ट्रेंड्स:

मुंबईतील भाडेकरूंपैकी बहुतांश लोक रिअल इस्टेट ब्रोकर्सना सक्रियतेने टाळत होते. प्रतिसाद देणाऱ्यांपैकी ४३% लोक रियल इस्टेट वेबसाइटची निवड करतात, तर ४१% लोक त्यांच्या सामाजिक संबंधांतून, मध्यस्थांकडून शोध घेतात. अनावश्यक ब्रोकरेज शुल्क टाळण्यासाठी हे केलं गेलं असावं.

सुरक्षा ही मुंबईतील ६६% भाडेकरूंसाठी सर्वात महत्त्वाची सुविधा आहे. त्यापैकी १३% लोकांनी सुरक्षिततेसाठी व्हिजिटर व सोसायटी मॅनेजमेंट अॅपच्या शोधात असल्याचं म्हटलं. स्वतंत्र घर आणि स्वतंत्र मजल्यांऐवजी सोसायटीत निवास शोधणाऱ्या भाडेकरूंचं प्रमाणही मुंबईत सर्वाधिक (७५%) एवढं आढळून आलं.

साथीच्या काळात डिजिटल पेमेंट टूलचा सर्वाधिक वापर झाला. मुंबईतील दोन तृतीयांश (६३%) भाडेकरूंनी त्यांचे भाडे बँक ट्रान्सफर किंवा नोब्रोकर पेच्या माध्यमातून दिले. डिजिटल व्यवहारांमध्ये मुंबई आणि पुण्याने बाजी मारली. त्यापैकी २४% लोकांनीच रोख रकमेद्वारे व्यवहार केला. मुंबईतील ८८% भाडेकरूंनी त्यांचे रेंटल अॅग्रीमेंट करण्यासाठी ऑनलाइन पोर्टलचा वापर करतात. इतर शहरांपेक्षा हे पुन्हा एकदा सर्वाधिक प्रमाण आहे. 

साथीच्या पार्श्वभूमीवर या भागाने नकारात्मक भाडेवाढ अनुभवली. मागील वर्षाच्या तुलनेत, १.५६% नी सरासरी भाडं घटलं.

नोब्रोकर डॉटकॉमचे सहसंस्थापक आणि सीबीओ सौरभ गर्ग म्हणाले, "२०२० मधील हे ट्रेंड्स साथीच्या उल्लेखाशिवाय पूर्ण करणं कठीण आहे. या साथीने लोकांना स्वत:च्या घराची किंमत कळाली. सहभागींपैकी ७८% लोक २०२१ मध्ये घर खरेदीचा विचार करत आहेत. विषाणूच्या उद्रेकामुळे उद्भवलेल्या सुरक्षेच्या चिंतेमुळे खरेदीदार तसंच भाडेकरूंना सोसायटीतील निवासाची गरज भासली, जिथं नव्या काळातील अॅपद्वारे निवासाचा अनुभव वृद्धिंगत केला जातो. हा ट्रेंड यापुढेही टिकून राहिल, असं आम्हाला वाटते.”

मालकांनी जपली माणुसकी:

कोव्हिड-१९ संकटाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर नोब्रोकर डॉटकॉमने आणखी एक महत्त्वाचं निरीक्षण केलं. मुंबईतील सर्वेक्षण केलेल्या मालकांपैकी जवळपास निम्म्या (४९%) घरमालकांनी लॉकडाऊनदरम्यान भाडेकरूंच्या फायद्यासाठी काही भाडं माफ केलं. 

शहरातील ७९% घरमालकांनी भाड्यासाठी संपूर्ण कुटुंबाला प्राधान्य दिलं. मुंबईतील फक्त १९% घरमालकांनी बॅचलर्सना भाड्याने घर देण्याची इच्छा व्यक्त केली.

(78 percent tenant in mumbai searching new property for purchase as per no broker report)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा