खलिस्तानी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर महाराष्ट्र?

कर्नालमध्ये चार खलिस्तानी दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

खलिस्तानी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर महाराष्ट्र?
SHARES

कर्नालमध्ये चार खलिस्तानी दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर महाराष्ट्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. हरियाणातील कर्नाल येथे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा महाराष्ट्र एटीएस (Maharashtra ATS) ताबा घेणार असल्याची माहिती आहे.

नांदेड, मनमाड आणि नवी मुंबई इथं खलिस्तानी दहशतवाद्यांचे स्लीपर सेल सक्रिय झाल्याची माहिती समोर येतेय. या स्लीपर सेल अॅक्टिव्ह करण्याची कट कारस्थानं रिंडा पाकिस्तानातून करत असल्याचंही आता समोर येतंय. त्यामुळे देशावर आणि राज्यावर खलिस्तानी दहशतवाद्यांचं संकट अधिक गडद झालंय. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मार्च महिन्यात हरविंदर रिंडाचे चार-पाच हस्तक नांदेडला येऊन आरडिक्स पोहचवून गेले आहेत.

सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड ते पंजाब दरम्यानच्या अनेक भागांमध्ये खलिस्तानवाद्यांचे स्लीपर सेल आहे. स्लीपर सेलच्या माध्यमातून युवकांना खलिस्तानी अजेंड्यासाठी तयार करत असल्याची माहिती समोर आली आहे.

हरियाणाच्या कर्नालमधून 4 दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर आणि त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर, महाराष्ट्र पोलीस सतर्क झाले आहेत. महाराष्ट्र पोलीस दहशतवाद्यांच्या पूर्वीच्या आरडीएक्सच्या खेपेचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान इंडिया टुडेनं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे की, तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, पॅसेंजर आणि मुंबई लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याची योजना होती.

तथापि, इंडिया टुडेने महाराष्ट्र एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी बोलले असता ते म्हणाले, "आमच्या माहितीनुसार, आरडीएक्स महाराष्ट्रात नाही."

एजन्सी मानतात की रिंदा सध्या इस्लामाबादमध्ये आहे. नांदेडचे एसपी प्रमोद शेवाळे यांच्या म्हणण्यानुसार, "रिंदाची टोळी खंडणीचे रॅकेट चालवते. खंडणी न दिल्यास ते खंडणीसाठी कॉल करतात आणि हल्ला करतात. त्याच्या 50 साथीदारांपैकी 17 साथीदार तुरुंगात आहेत, काही जामिनावर बाहेर आहेत तर काही फरार आहेत. रिंदा आणि त्याच्या टोळीवर खंडणी आणि खुनाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. अधिक चौकशीसाठी नांदेड पोलिसांचे पथक कर्नाळ येथे पोहोचले आहे.हेही वाचा

मुंबईत अनेक ठिकाणी NIAची छापेमारी, दाऊदच्या संबंधितांवर कारवाई

अजानसाठी लाऊडस्पीकर वापरल्यानं मुंबईतील २ मशिदींविरोधात गुन्हा दाखल

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा