COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
51,38,973
Recovered:
44,69,425
Deaths:
76,398
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
45,534
1,794
Maharashtra
5,90,818
37,236

राज्यातील एनआयए पथकाचे प्रमुख अनिल शुक्ला यांची बदली

अनिल शुक्ला यांची मिझोरामला बदली करण्यात आली आहे. या बदलीवर राष्ट्रवादी काँग्रेसने संशय व्यक्त केला आहे.

राज्यातील एनआयए पथकाचे प्रमुख अनिल शुक्ला यांची बदली
SHARES

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर कारमध्ये ठेवण्यात आलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाचा तपास एनआयए करत आहे.  एनआयएच्या पथकाचे नेतृत्व करणारे महानिरीक्षक अनिल शुक्ला यांची अचानक बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी ज्ञानेंद्र वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अनिल शुक्ला यांची मिझोरामला बदली करण्यात आली आहे. या बदलीवर राष्ट्रवादी काँग्रेसने संशय व्यक्त केला आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री व राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी या बदलीवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

आतापर्यंत याप्रकरणी सचिन वाझे ,विनायक शिंदे, रियाझ काझी यांच्यासह अनेक आरोपींना अटक केली असून हा तपास सध्या अत्यंत महत्त्वाच्या वळणावर असतानाच अनिल शुक्ला यांच्या बदली करण्यात आली आहे .त्यामुळे या बदलीची चौकशी झाली पाहिजे आणि अचानक बदली करण्यामागे कारण काय? असा सवाल मुश्रीफ यांनी उपस्थित केला आहे. 

शुक्ला यांनी परमवीर सिंग यांना मुख्य आरोपी केले आहे.कदाचित हे केंद्र सरकारला नकोसे वाटत असावे. तसेच परमवीर सिंग यांनाच आता माफीचा साक्षीदार व्हावेसे वाटत असावे हे या बदलीवरून स्पष्ट होत असल्याचा संशय हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे. 

अनिल शुक्ला हे मिझोराम केडरचे १९९८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांना महाराष्ट्रात प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले होते. प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ संपल्यानंतर नियमानुसारच त्यांची बदली करण्यात आली आहे, असेही सांगण्यात येत आहे. हेही वाचा - 

आर्थिक गुन्हे शाखेतील १३ अधिकाऱ्यांच्या बदल्या

देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी सुशील चंद्रा

आता १० वी, १२वी च्या परीक्षांसाठीही ‘एसओपी’

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा