Advertisement

देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी सुशील चंद्रा

देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी सुशील चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी ते पदभार स्वीकरणार आहेत.

देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी सुशील चंद्रा
SHARES

देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी सुशील चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी ते पदभार स्वीकरणार आहेत. सध्या ते निवडणूक आयुक्तपदावर कार्यरत आहेत. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी सुशील चंद्रा यांची देशाचे २४ वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे.  पुढील वर्षी उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर, उत्तराखंडमध्ये होणाऱ्या निवडणुकांची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.

या अगोदर सुनील अरोरा यांच्याकडे मुख्य निवडणूक आयुक्त पदाची जबाबदारी होती. ते सोमवारी निवृत्त झाले आहेत.  सुशील चंद्रा यांचा कार्यकाळ १४ मे २०२२ पर्यंत असणार आहे. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी सुशील चंद्रा यांना निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले होते.  चंद्रा यांचा जन्म १५ मे १९५७ चा असून ते १९८० च्या तुकडीचे भारतीय महसूल सेवेतील (आय.आर.एस.) अधिकारी आहेत.

त्यांनी आयआर.एस. सेवेदरम्यान उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, दिल्ली आणि गुजरात आदी राज्यामध्ये काम केले आहे. रुरकी विद्यापीठ तसेच डेहराडून येथील डी.ए.व्ही. महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले आहे.

चंद्रा यांनी अंतर्गत कररचना आणि अन्वेषण कार्यात विशेष काम केले आहे. मुंबई येथे अन्वेषण विभागाचे संचालक आणि गुजरातचे अन्वेषण महासंचालक म्हणून प्रभावी कामकाज केले असून सिंगापूर, आयआयएम बेंगळुरू आदी ठिकाणी विविध प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेतला आहे.

निवडणूक आयुक्त म्हणून कार्यभार संभाळण्यापूर्वी ते भारत सरकारच्या वित्त मंत्रालय, महसूल विभागांतर्गत केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (सी.बी.डी.टी.) अध्यक्ष म्हणून तसेच सी.बी.डी.टी.चे सदस्य (अन्वेषण) म्हणून कार्यरत होते.



हेही वाचा - 

मार्चमध्ये सोन्याच्या आयातीत तब्बल ४७१ टक्के वाढ, 'हे' आहे कारण

अबब! मुंबईतील घर विकलं गेलं तब्बल १ हजार कोटींना

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा