Advertisement

अबब! मुंबईतील घर विकलं गेलं तब्बल १ हजार कोटींना

मुंबईतील पॉश एरिया असलेल्या मलबार हिलमध्ये ५७५२.२२ चौरस मीटरचा हा बंगला आहे. मलबार हीलमधील नारायण दाभोलकर मार्गावर 'मधुकुंज' हा बंगला आहे.

अबब! मुंबईतील घर विकलं गेलं तब्बल १ हजार कोटींना
Image source: DMART website
SHARES

मुंबईतील मलबार येथील एक घर तब्बल १ हजार कोटी रुपयांना विकलं गेलं आहे. देशातील प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि डी-मार्ट या सुपरमार्केट्सचे मालक असलेले राधाकिशन दमानी यांनी हे घर खरेदी गेलं आहे. हा व्यवहार फक्त मुंबईतीलच नाही तर देशातील सर्वात महागडा व्यवहार ठरला असल्याचं म्हटलं जात आहे. 

मुंबईतील पॉश एरिया असलेल्या मलबार हिलमध्ये ५७५२.२२ चौरस मीटरचा हा बंगला आहे. मलबार हीलमधील नारायण दाभोलकर मार्गावर 'मधुकुंज' हा बंगला आहे. धाकिशन दमानी आणि त्यांचे भाऊ गोपीकिशन यांनी पुरचंद रॉयचंद अँड सन्स, परेशंद रॉयचंद अँड सन्स, प्रेमचंद रॉयचंद अँड सन्स यांच्याकडून हे घर खरेदी केलं. १००१ कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. याची दस्त नोंदणी ३१ मार्च रोजी झाली आहे.

'मधुकुंज' या प्रॉपर्टीचे क्षेत्रफळ ५७५२.२२ चौरस मीटर आहे. रेडीरेकनरनुसार या प्रॉपर्टीची किंमत ७२३.९८ कोटी रुपये आहे. या व्यवहारात दमानी यांनी ३०.०३ कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरली आहे. देशातील नावाजलेले गुंतवणूकदार आणि सर्वाधिक श्रीमंतांमध्ये दमानी यांची गणना होते. फोर्ब्जच्या श्रीमंतांच्या यादीत दमानी हे चौथे श्रीमंत भारतीय आहेत. त्यांची संपत्ती १२ हजार कोटी रुपये आहे.

राधाकिशन दमानी हे नेमही पांढऱ्या कपडे परिधान करतात. त्यामुळे मोठ्या गुंतवणूकदारांमध्ये ते ‘मिस्टर व्हाईट अँड व्हाईट’ म्हणून परिचीत आहेत. त्यांनी १९९९ मध्ये रिटेल बिझनेस सुरु केला होता.



हेही वाचा -

पोस्टातून २० लाखांहून अधिक पैसे काढल्यास द्यावा लागणार टीडीएस

ठेवीदारांना दिलासा, पीपीएफ व्याजदरात कपातीचा आदेश चुकून निघाला



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा