Advertisement

मार्चमध्ये सोन्याच्या आयातीत तब्बल ४७१ टक्के वाढ, 'हे' आहे कारण

भारत जगातील दुस-या क्रमांकाचा सोन्याचा खरेदीदार आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीत सोन्याची आयात ३२१ टन झाली आहे.

मार्चमध्ये सोन्याच्या आयातीत तब्बल ४७१ टक्के वाढ, 'हे' आहे कारण
SHARES

मार्च महिन्यात सोन्याची आयातीत तब्बल ४७१ टक्के वाढ झाली आहे. या महिन्यात १६० टन सोनं आयात करण्यात आलं आहे. आयात शुल्कात कपात आणि किंमती घटल्याने सोने खरेदीदारांची संख्या वाढली. त्यामुळे सोन्याच्या आयातीने विक्रम केला आहे. 

भारत जगातील दुस-या क्रमांकाचा सोन्याचा खरेदीदार आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीत सोन्याची आयात ३२१ टन झाली आहे. मागील वर्षी याच तिमाहीत ही आयात १२४ टन होती. मार्च तिमाहीत मागील वर्षीच्या तिमाहीच्या  १.२३ अब्ज डाॅलरच्या तुलनेत आयात ८.४ अब्ज डॉलर्सची झाली आहे.

फेब्रुवारीमध्ये सरकारने सोन्याचे आयात शुल्क कमी करून १०.७५ टक्क्यांवर आणले आहे. आधी हे शुल्क १२ टक्के होते. तसंच सोन्याच्या किंमतीत सातत्याने घट झाली. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये १० ग्रॅमची किंमत ५६,२०० रुपयांवर पोहोचली होती. ही आतापर्यंतची सर्वोच्च किंमत आहे. तर मार्च २०२१ मध्ये सोन्याचा भावात मोठी घसरण झाली. प्रती तोळा  सोन्याचा भाव ४३,३२० रुपये झाला होता.

मार्चमध्ये सोन्याच्या आयातीबरोबरच देशाच्या एकूण आयातीमध्येही वाढ नोंदविण्यात आली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत मार्चमध्ये आयात ५३ टक्क्याने वाढून ३५१८ अब्ज रुपये झाली आहे. 

 मार्चमध्ये देशाच्या निर्यातीत ५८ टक्क्यांनी वाढ झाली आहे, जी आतापर्यंतची सर्वात मोठी मासिक वाढ आहे. मार्च २०२१ मध्ये देशाची व्यापार तूट वाढून १०२६ अब्ज रुपये झाली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात व्यापार तूट ७३३ अब्ज रुपये होती.



हेही वाचा -

एसबीआयचं गृहकर्ज महागलं, व्याजदरात 'इतकी' वाढ

पोस्टातून २० लाखांहून अधिक पैसे काढल्यास द्यावा लागणार टीडीएस

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा