Advertisement

एसबीआयचं गृहकर्ज महागलं, व्याजदरात 'इतकी' वाढ

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाकडून (एसबीआय) तुम्ही गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आता तुम्हाला अधिक व्याज द्यावं लागेल.

एसबीआयचं गृहकर्ज महागलं, व्याजदरात 'इतकी' वाढ
SHARES

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाकडून (एसबीआय) तुम्ही गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आता तुम्हाला अधिक व्याज द्यावं लागेल. एसबीआयने आपल्या गृहकर्जावरील व्याजदरात ०.२५ टक्के वाढ केली आहे. त्यामुळे बँकेचा व्याजदर ६.७० टक्क्यांवरून वरुन ६.९५ टक्के झाला आहे.

एसबीआयच्या ग्राहकांना आता ७५ लाख रुपयांच्या गृहकर्जावर ६.९५ टक्के व्याजदर आकारला जाणार आहे. तर ७५ लाख रुपयांपेक्षा अधिक कर्जावरील व्याजदर ७ टक्के झाला आहे.  याशिवाय गृहकर्ज घेणाऱ्यांना कर्जावरील प्रक्रिया शुल्कही द्यावं लागणार आहे. एसबीआयने कर्जावरील प्रक्रिया शुल्क ३१ मार्चपर्यंत माफ केलं होतं. एकूण कर्जावर  ०.४० टक्के प्रक्रिया शुल्क भरावं लागेल. हे शुल्क १० हजार ते ३० हजार रुपयांपर्यंत आहे.

एसबीआयव्यतिरिक्त आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि कोटक महिंद्रा बँकेनेही गृहकर्ज व्याजदरात वाढ केली आहे. कोटक महिंद्रा बँक सर्वात कमी व्याजदराचे कर्ज देत आहे. कोटक महिंद्रा बँकेचा गृहकर्जाचा व्याजदर ६.६५ टक्के आहे. पण आता हा व्याजदर ६.७५ टक्के झाला आहे.हेही वाचा -

पोस्टातून २० लाखांहून अधिक पैसे काढल्यास द्यावा लागणार टीडीएस

ठेवीदारांना दिलासा, पीपीएफ व्याजदरात कपातीचा आदेश चुकून निघालाRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा